पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला ८ गडी राखून धूळ चारली. शिमरॉन हेटमायर (१३९) आणि शे होप (१०२) यांनी ठोकलेल्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने मालिकेत विजयी सलामी दिली. हेटमायर आणि होप यांच्या फटकेबाजीवर अंकुश लावणं कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही. या दोघांनी द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने ४८ व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले.

Video : बापरे..!! रोहितने मैदानावरच दिली पोलार्डला शिवी

सामन्यात दोनही डावाची सुरूवात गोलंदाजांसाठी चांगली ठरली असली, तरी हा सामना अखेर फलंदाजांचा ठरला. भारतीय खेळपट्या आणि त्यातही चेन्नईची चेपॉकची खेळपट्टी ही केवळ फिरकीपटूंना पोषक असतो. पण रविवारच्या सामन्यात अगदी उलट घडले. या सामन्यात वेस्ट इंडीज आणि भारत दोघांनी मिळून एकूण ९७.५ षटके फेकली. त्यापैकी फिरकी गोलंदाजांनी एकूण ३३ षटके गोलंदाजी केली, पण त्या ३३ षटकात गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. फिरकी गोलंदाजांनी तब्बल ३३ षटके टाकूनदेखील त्यांना यश न मिळण्याचा हा प्रकार भारतात पहिल्यांदाच घडला.

Video : जाडेजाच्या रन-आऊटवरून वाद; विराट म्हणतो….

वेस्ट इंडिजकडून हेडन वॉल्श ज्युनिअरने ५ षटकात ३१ धावा दिल्या. तर रॉस्टन चेसने ७ षटकात ४२ धावा दिल्या. त्यानंतर भारताकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजाने १०-१० षटके टाकली. कुलदीपने ४५ तर जाडेजाने ५८ धावा दिल्या. याशिवाय केदार जाधवने १ षटक टाकले आणि ११ धावा दिल्या. पण पाचही गोलंदाजांना बळी टिपता आला नाही.

ICC Test rankings : विराट, टीम इंडिया अव्वल स्थानी कायम, पण…

दरम्यान, पहिल्या सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की ओढवली. भारताने प्रथम फलंदाजी करत २८७ धावांपर्यंत मजल मारली. पंतने ७१ तर अय्यरने ७० धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना हेटमायर आणि होप जोडीने भारताकडून अक्षरश: विजय हिसकावून घेतला.