IND vs WI 1st T20 Live News in Marathi, 29 July 2022 : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका आजपासून (२९ जुलै) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना तारौबा येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा ६८ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकांमध्ये सहा बाद १९० धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक आणि दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीमुळे भारताला १९० धावांपर्यंत मजल मारता आली.

Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: लखनौला ‘यश’ मिळवून देणारा विदर्भवीर ठाकूर आहे तरी कोण?
Live Updates

India vs West Indies 1st T20 Live : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज पहिल्या टी २० सामन्यातील सर्व लाईव्ह अपडेट्स

23:29 (IST) 29 Jul 2022
वेस्ट इंडीजचा आठवा गडी बाद

अर्शदीप सिंगने वेस्ट इंडीजचा आठवा गडी माघारी धाडला आहे. यजमानांची अवस्था आठ बाद १०५ अशी झाली आहे.

23:06 (IST) 29 Jul 2022
वेस्ट इंडीजचा सातवा गडी बाद

ओडेन स्मिथच्या रुपात वेस्ट इंडीजचा सातवा गडी बाद झाला आहे. रवी बिश्नोईने स्मिथला भोपळाही फोडू दिला नाही.

23:02 (IST) 29 Jul 2022
शिमरॉन हेटमायर स्वस्तात बाद

शिमरॉन हेटमायर स्वस्तात बाद झाला आहे. तो १६ धावा करून माघारी परतला. यजमानांची अवस्था ६ बाद ८६ अशी झाली आहे.

22:56 (IST) 29 Jul 2022
यजमानांचा अर्धा संघ माघारी

विंडीजची फलंदाजी कोसळली असून रोव्हमन पॉवेलच्या रुपात त्यांचा पाचवा गडी बाद झाला आहे. विंडीजची अवस्था पाच बाद ८२ अशी झाली आहे.

22:44 (IST) 29 Jul 2022
कर्णधार निकोलस पूरन बाद

कर्णधार निकोलस पूरन बाद १८ धावा करून बाद झाला आहे. रविचंद्रन अश्विनने त्याला ऋषभ पंतकरवी बाद केले. विंडीजच्या ८.२ षटकांमध्ये चार बाद ६६ धावा झाल्या आहेत.

22:33 (IST) 29 Jul 2022
सहा षटकांमध्ये विंडीजच्या तीन बाद ४२ धावा

पावर प्लेच्या सहा षटकांमध्ये विंडीजच्या तीन बाद ४२ धावा झाल्या आहेत.

22:31 (IST) 29 Jul 2022
वेस्ट इंडीजचा तिसरा गडी तंबूत

आश्वासक सुरुवातीनंतर विंडीजचा डाव गडगडण्याच्या स्थितीत आहे. भुवनेश्वर कुमारने शामराह ब्रुक्सला त्रिफळाचित केले आहे.

22:16 (IST) 29 Jul 2022
वेस्ट इंडीजचा दुसरा गडी तंबूत

रविंद्र जडेजाने आपल्या पहिल्या षटकात वेस्ट इंडीजला धक्का दिला. त्याने जेसन होल्डरला शून्यावर तंबूत धाडले. विंडीजच्या तीन षटकांमध्ये दोन बाद २७ धावा झाल्या आहेत.

22:12 (IST) 29 Jul 2022
विंडीजच्या पहिल्या दोन षटकांमध्ये एक बाद २२ धावा

विंडीजच्या पहिल्या दोन षटकांमध्ये एक बाद २२ धावा झाल्या आहेत. शामराह ब्रूक्स आणि जेसन होल्डर मैदानावरती उपस्थित आहेत.

22:09 (IST) 29 Jul 2022
वेस्ट इंडीजचा पहिला गडी बाद

अर्शदीप सिंगने वेस्ट इंडीजचा पहिला गडी बाद केला आहे. कायले मेयर्स १५ धावा करून बाद झाला.

22:02 (IST) 29 Jul 2022
वेस्ट इंडीजची फलंदाजी सुरू

वेस्ट इंडीजची फलंदाजी सुरू झाली आहे. १९१ धावांचा पाठलाग करण्यासाठी विंडीजचे सलामीवीर मैदानात उतरले आहेत.

21:51 (IST) 29 Jul 2022
विंडीजसमोर १९१ धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकांमध्ये सहा बाद १९० धावा केल्या.

21:26 (IST) 29 Jul 2022
भारताचा सहावा गडी बाद

रविंद्र जडेजाच्या रुपात भारताचा सहावा गडी बाद झाला. जडेजाला अल्झारी जोसेफने माघारी धाडले. भारताच्या १६ षटकांमध्ये सहा बाद १३८ धावा झाल्या आहेत.

21:20 (IST) 29 Jul 2022
कर्णधार रोहित शर्मा बाद

कर्णधार रोहित शर्मा बाद झाला आहे. त्याने ४४ चेंडूत ६४ धावा केल्या. १५ षटकांमध्ये भारताच्या पाच बाद १३१ धावा झाल्या आहेत.

21:03 (IST) 29 Jul 2022
हार्दिक पंड्या एक धाव करून बाद

हार्दिक पंड्याच्या रुपात भारताचा चौथा गडी बाद झाला आहे. तो अवघी एक धाव करून बाद झाला. भारताची अवस्था चार बाद १०२ अशी झाली आहे.

21:01 (IST) 29 Jul 2022
रोहित शर्माचे शानदार अर्धशतक

रोहितने ३५ चेंडूत ५२ धावा फटकावल्या आहेत.

20:54 (IST) 29 Jul 2022
भारताचा तिसरा गडी बाद

१०व्या षटकामध्ये भारताचा तिसरा गडी बाद झाला आहे. ऋषभ पंत १४ धावा करून माघारी परतला. भारताच्या तीन बाद ८८ धावा झाल्या आहेत.

20:46 (IST) 29 Jul 2022
रोहित शर्मा आणि पंतचा डाव सावरण्याचा प्रयत्न

रोहित शर्मा आणि ऋषभ पंत डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहित शर्मा ३३ तर पंत ९ धावांवर खेळत आहेत.

20:37 (IST) 29 Jul 2022
भारताचे अर्धशतक पूर्ण

सात षटकांमध्ये दोन गडी गमावून भारताचे अर्धशतक पूर्ण झाले आहे.

20:32 (IST) 29 Jul 2022
श्रेयस अय्यर शून्यावर बाद

श्रेयस अय्यरच्या रुपात भारताचा दुसरा गडी बाद झाला. अय्यर शून्यावर बाद झाला आहे. भारताच्या सहा षटकांमध्ये दोन बाद ४५ धावा झाल्या आहेत.

20:25 (IST) 29 Jul 2022
भारताला पहिला धक्का

सूर्यकुमार यादवच्या रुपात भारताचा पहिला गडी बाद झाला आहे. अकिल होसेनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. भारताच्या पाच षटकांमध्ये एक बाद ४४ धावा झाल्या आहेत.

20:21 (IST) 29 Jul 2022
चार षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ४३ धावा

चार षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ४३ धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा १४ आणि सूर्यकुमार यादव २४ धावांवर खेळत आहेत.

20:12 (IST) 29 Jul 2022
दोन षटकांमध्ये भारताच्या बिनबाद २० धावा

दोन षटकांमध्ये भारताच्या बिनबाद २० धावा झाल्या आहेत. भारतीय सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली.

20:02 (IST) 29 Jul 2022
भारतीय फलंदाजीला सुरुवात

भारतीय फलंदाजीला सुरुवात झाली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डावाची सुरुवात केली आहे.

19:45 (IST) 29 Jul 2022
विंडीज संघात शिमरॉन हेटमायरचे पुनरागमन

वेस्ट इंडीज संघ : शामराह ब्रूक्स, कायले मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडियन स्मिथ, जेसन होल्डर, अकिल होसेन, रोमारियो शेफर्ड, ओबेड मॅककॉय, अल्झारी जोसेफ, किमो पॉल

19:40 (IST) 29 Jul 2022
भारतीय संघात अश्विन आणि पंतचे पुनरागमन

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, रवी बिश्नोई, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग

19:35 (IST) 29 Jul 2022
नाणेफेक जिंकून विंडीजचा गोलंदाजीचा निर्णय

वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.