IND vs WI Test Live Streaming: वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही दोन सामन्यांची कसोटी मालिका २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना अहमदाबादमध्ये होणार असून कसोटी मालिकेसाठी निवड झालेले खेळाडू दुबईहून थेट अहमदाबादला पोहोचले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिजमधील ही कसोटी मालिका टीव्ही आणि मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहता येणार, जाणून घ्या.
२०२५ च्या आशिया चषकात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर, टीम इंडियाचं लक्ष आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर आहे. टी-२० नंतर कसोटी क्रिकेटसाठी सज्ज होणं खेळाडूंसाठी कठीण असणार आह. त्याकरता ३० सप्टेंबरपासून लगेच भारतीय संघाने सरावाला सुरूवात केली आहे. शुबमन गिल, जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू कसोटी सामन्यात खेळताना दिसणार आहेत.
न्यूझीलंडविरूद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका पराभवानंतर वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटीसाठी टीम इंडिया कसून सराव करत आहे. गेल्यावर्षी न्यूझीलंडने भारताचा घरच्या मैदानावर ३-०ने मालिका पराभव केला होता. ज्यामुळे त्यांना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे तिकीट गमवाव लागलं होतं.
आशिया चषकादरम्यानच कसोटी मालिकेसाठी संघाची निवड करण्यात आली होती. इंग्लंड दौऱ्यादरम्यान या तरुण संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि म्हणूनच त्यांना मालिका बरोबरीत आणण्यात यश आले. पण इंग्लंड मालिकेपेक्षा हा संघ थोडा वेगळा असणार आहे. शुबमन गिल संघाचा कर्णधार असणार आहे. तर ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा उपकर्णधार असणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना कधीपासून खेळवला जात आहे?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे,.
भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार आहेत?
भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरू होतील. तर नाणेफेक ९ वाजता होईल.
टीव्हीवर कुठे लाईव्ह पाहता येणार भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेचे सामने? (Where To Watch IND vs WI Test Series Matches Live?)
भारत आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेचे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. तर मोबाईलमध्ये जिओ हॉटस्टारवर हे सामने पाहता येतील.
भारत वि. वेस्ट इंडिज कसोटी मालिकेचं वेळापत्रक
२ ते ६ ऑक्टोबर – भारत वि. वेस्ट इंडिज पहिली कसोटी – अहमदाबाद
१० ते १४ ऑक्टोबर – भारत वि वेस्ट इंडिज दुसरी कसोटी – दिल्ली