किंग चषक फुटबॉल स्पर्धा

प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या विजयाची नोंद करताना भारताने शनिवारी किंग चषक फुटबॉल स्पर्धेत यजमान थायलंडवर १-० असा विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले.

कुराकाओविरुद्ध ३-१ असा पराभव पत्करल्यामुळे भारताची अंतिम फेरीची संधी हुकली. थंडर कास्टल स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यासाठी भारताने सुनील छेत्री, उदांता सिंग आणि गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू यांना विश्रांती दिली. १७व्या मिनिटाला अनिरुद्ध थापाने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर भारताने यंदाच्या वर्षांतील थायलंडवरचा दुसरा विजय मिळवला. वर्षांच्या सुरुवातीस झालेल्या आशियाई चषकातसुद्धा भारताने थायलंडला धूळ चारली होती.

अनिरुद्ध थापा