आगामी इंग्लंड दौऱ्यात भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मानांकनात सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. सध्या भारतीय संघ १०२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड १०० गुणांसह त्यांच्याखालोखाल आहे. जर भारताने ही मालिका जिंकली तर त्यांना तिसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याची संधी आहे. इंग्लंडला तिसरे स्थान मिळविण्यासाठी किमान दोन कसोटी सामन्यांच्या फरकाने मालिका जिंकावी लागणार आहे. जर एक कसोटी त्यांनी जिंकली तर त्यांचे भारताइतकेच गुण होतील. जर भारताने सर्व पाच कसोटी सामने जिंकले तर इंग्लंडचा संघ सातव्या क्रमांकावर फेकला जाईल. ४-१ असा भारताने विजय मिळविल्यास इंग्लंडला सहावे स्थान मिळेल. जर इंग्लंडने ४-० असा विजय मिळविला तर भारताची सातव्या क्रमांकापर्यंत घसरण होईल.