भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजचे मत

नवी दिल्ली : सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा भरणा तसेच महेंद्रसिंह धोनीचा अनुभव यामुळेच आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारत विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार आहे, असा विश्वास भारताच्या एकदिवसीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केला.

‘‘भारताकडे एकहाती सामना जिंकून देणारे अनेक खेळाडू आहेत. कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि फिरकीपटू भारताला कोणत्याही परिस्थितीत तारू शकतात. जो संघ आव्हानात्मक धावसंख्या उभारेल आणि त्यांचे गोलंदाज हे आव्हान प्रतिस्पध्र्याला गाठू देणार नाहीत, तोच संघ विजेता होईल. गोलंदाजी आणि फलंदाजीत भारताकडे सक्षम खेळाडू आहेत,’’ असे मितालीने सांगितले.

कोणत्या संघाला विश्वचषक विजयाची संधी आहे, असे विचारल्यावर मिताली म्हणाली, ‘‘स्वाभाविकपणे भारतच विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्येही विश्वचषक उंचावण्याची क्षमता आहे.’’