Uzbekistan in beat Team India : अहमद बिन अली स्टेडियमवर उझबेकिस्तानविरुद्ध ०-३ असा पराभव झाल्याने एएफसी आशियाई चषकच्या बाद फेरीतील भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी ब गटातील दुसऱ्या लढतीत उझबेकिस्तानने भारतीय पुरुष फुटबॉल संघाविरुद्ध खूप मजबूत असल्याचे सिद्ध केले. फिफा क्रमवारीत ६८व्या क्रमांकावर असलेल्या उझबेकिस्तानने पूर्वार्धात तीन गोल केले. त्यामुळे टीम इंडिया दडपणाखाली आली. भारतीय संघ उत्तरार्धात छाप पाडण्यात यशस्वी ठरला. उत्तरार्धात टीम इंडियाने अनेकवेळा चेंडू डी कडे पाठवला, पण उझबेकिस्तानच्या गोलरक्षकाने अप्रतिम बचाव केला, मात्र उझबेकिस्तान संघाने पूर्ण वेळेपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली.

उझबेकिस्तानसाठी अबोशबेक फैझुल्लाएवने चौथ्या मिनिटाला, इगोर सेर्गिएव्हने १८व्या मिनिटाला आणि शेरझोद नसरुलाएवने हाफ टाईमच्या आधी गोल केले. जागतिक क्रमवारीत भारत १०२व्या, तर उझबेकिस्तान ६८व्या क्रमांकावर आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण नऊ सामने झाले आहेत. या नऊ सामन्यांमध्ये भारताने उझबेकिस्तानचा फक्त एकदा पराभव केला आहे. त्याचबरोबर सहा सामन्यात पराभव झाला असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Lucknow beat Gujarat by 33 runs in IPL 2024
LSG vs GT : लखनऊविरुद्धच्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला; कोणावर फोडले खापर? घ्या जाणून
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

भारतीय बचावफळीने सुरुवातीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखण्यासाठी संघर्ष केला आणि अनेक प्रसंगी निराशाजनक कामगिरी केली. पहिला सामना गमावल्यानंतर आकाश मिश्रा, अनिरुद्ध थापा आणि नौरोम महेश ब्लू टायगर्ससाठी सुरुवातीच्या अकराव्यामध्ये आले पण स्टार मिडफिल्डर सहल अब्दुल समद दुखापतीमुळे बाहेर राहिला.

हेही वाचा – इरफान पठाणने भाऊ युसूफच्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO होतोय व्हायरल

उझबेकिस्तानने १० क्रमांकाच्या इबोस्बेक फैझुल्लायेवच्या सहाय्याने सुरुवातीची आघाडी घेतली, फैझुल्लायेवने उजव्या बाजूने क्रॉस वितरीत केला. स्ट्रायकर इगोर सर्गेव्हने फैझुल्लायेवच्या अप्रतिम प्रयत्नानंतर पोस्टच्या पाठीमागे मारलेल्या फटक्यानंतर २-० अशी आघाडी घेतली. सर्गीव्हला रिकामे नेट शोधण्यात कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळे त्याने भारतीय बचावफळी अगदी सहज भेदली. खेळाचा तिसरा गोल पहिल्या हाफच्या शिट्टीपूर्वी झाला. लेफ्ट-बॅक शेरझोद नसरुल्लाएवने गुरप्रीत सिंग संधूला सहज हेडरने चकवा दिला.

हेही वाचा – IND vs AFG : ‘टीम इंडियाने तक्रार करायला नको होती कारण…’, वादग्रस्त ओव्हरथ्रोवर आकाश चोप्राने दिली प्रतिक्रिया

ब्लू टायगर्स ब गटात एकही गोल न करता चौथ्या स्थानावर असून २३ जानेवारीला होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात त्यांचा सामना सीरियाशी होईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ आणि सहा गटांतील चार सर्वोत्तम तृतीय क्रमांकाचे संघ बाद फेरीत प्रवेश करतील. अशा स्थितीत भारताला सीरियाविरुद्ध कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल. त्याच वेळी, त्यांना त्यांच्या नशिबावर देखील अवलंबू रहावे लागेल.