Irfan Pathan hugging Yusuf after hitting him for a six : इरफान पठाणने मोठा भाऊ युसूफ पठाणच्या चेंडूवर जोरदार षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला, मात्र षटकार ठोकल्यानंतर इरफानने मोठा भाऊ युसूफला मिठी मारली. वास्तविक, एका चॅरिटी मॅचमध्ये इरफान आणि युसूफ पठाण वेगवेगळ्या टीममधून एकमेकांविरुद्ध खेळत होते. सामन्यात अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, इरफानला भाऊ युसूफच्या चेंडूवर षटकार मारावा लागला. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चॅरिटी मॅच वन वर्ल्ड आणि वन फॅमिली यांच्यात खेळली गेली. या सामन्यात इरफान पठाणच्या वन वर्ल्ड संघाला शेवटच्या २ चेंडूत ३ धावांची गरज होती. इरफान स्ट्राईकवर उपस्थित होता आणि त्याचा मोठा भाऊ युसूफ पठाण वन फॅमिलीतर्फे गोलंदाजी करत होता. इरफानने भाऊ युसूफच्या चेंडूवर शानदार षटकार मारत वन वर्ल्ड संघाला सामना जिंकून दिला. मात्र षटकार मारल्यानंतर इरफानने युसूफ पठाणला मिठी मारली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इरफान पठाण आपल्या मोठ्या भावाच्या चेंडूवर शानदार षटकार मारतो. षटकार मारल्यानंतर इरफान हसत हसत युसूफ पठाणकडे जातो आणि त्याला मिठी मारतो. मिठी मारल्यानंतर युसूफही धाकट्या भावाच्या पाठीवर थाप दिली. यानंतर सामना संपला आणि सर्व खेळाडू ड्रेसिंग रूमच्या दिशेने गेले. यावेळी कॉमेंट्री करत असलेल्या आकाश चोप्राने सांगितले की, दोन्ही भावांमध्ये खूप प्रेम आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : “तुम्ही प्रत्येक खेळाडूला आनंदी…”, विश्वचषकाच्या भारतीय संघ निवडीवर रोहित शर्माचे वक्तव्य

या सामन्यात इरफान पठाणने वन वर्ल्डसाठी ५ चेंडूत १२ धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी साकारली. याशिवाय अनुभवी सचिन तेंडुलकरने १६ चेंडूत २७ धावा केल्या. अल्विरो पीटरसनने सामन्यातील सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने ५० चेंडूत ७४ धावा केल्या.