आज न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजय गरजेचा

हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्ध रविवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा आहे. तसेच भारतीय संघाला मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी या सामन्यात विजय अनिवार्य आहे.

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: सर्वात वेगवान चेंडू टाकणारा मयंक यादव आहे तरी कोण?

भारतीय संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ ०-१ अशा पिछाडीवर आहे. इडन पार्कच्या छोटय़ा मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात धवन आणि गिल जोडीला ‘पॉवर-प्ले’च्या १० षटकांत ४० धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या षटकांत धवन आणि गिल यांनी अधिक आक्रमकता दाखवणे गरजेचे आहे.

  • वेळ : सकाळी ७ वा.
  • थेट प्रक्षेपण : अ‍ॅमेझॉन प्राइम, डीडी स्पोर्ट्स