Pakistan Tennis Player Handshake Controversy: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या तणावाचे पडसाद खेळाच्या मैदानावरही उमटताना दिसत आहेत. शनिवारी कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (अंडर-१६) सामन्यात भारताने पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला. सामन्यानंतर भारतीय टेनिसपटूने पाकिस्तानी खेळाडूकडे हस्तांदोलनासाठी हात पुढे केला असता, पाकिस्तानी खेळाडू उर्मटपणे वागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताचे टेनिसपटू प्रकाश सरन आणि तविश पाहवा यांनी सुपर टाय-ब्रेकमध्ये त्यांचे एकेरी सामने जिंकत पाकिस्तानचा २-० असा पराभव केला. पराभवानंतर संतापलेल्या पाकिस्तानी खेळाडूच्या वर्तणुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक पाकिस्तानी खेळाडू भारतीय टेनिसपटूसोबत अतिशय असभ्यपणे हस्तांदोलन करताना दिसत आहे. हस्तांदोलन करताना त्या पाकिस्तानी खेळाडूने भारतीय खेळाडूकडे जोरात हात भिरकावला. सुदैवाने तो हात भारतीय खेळाडूच्या तोंडावर लागता लागता वाचला.

त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात, पाकिस्तानी खेळाडूने हस्तांदोलन केले पण त्याने काही क्षणातच त्याचा हात बाजूला केला, ज्यामुळे त्याची पराभवानंतरची निराशा स्पष्टपणे दिसून आली. दरम्यान हा प्रकार पाकिस्तानचा मिकाईल अली बेग आणि भारताचा तविश पाहवा यांच्यात घडला.

हा सर्व प्रकार घडला तेव्हा तविश पाहवाने खूप परिपक्वता आणि संयम दाखवला. या घटनेवर त्याने कोणतीही वाईट प्रतिक्रिया दिली नाही किंवा काहीही अनुचित केले नाही.

या घटनेनंतर पाकिस्तानचा मिकाईल अली बेग त्याच्या अशा वागण्यामुळे सोशल मीडियावर टीकेचा विषय बनला आहे. टेनिस चाहत्यांनी त्याच्यावर खूप टीका केली आहे.

भारतीय टेनिस चाहते शाहिद ए. शेख यांनी एक्स वर लिहिले की, “ही मानसिकताच वाईट आणि विकृत आहे.” दुसऱ्या चाहत्याने म्हटले की, यांच्यामध्ये खिलाडूवृत्ती; नाही, त्याच्यावर बंदी घातली पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हा हस्तांदोलनाचा वाद भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या काही दिवसांनंतर झाला आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.