भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील कोणताही सामना नेहमीच उत्कंठापूर्ण वातावरणात खेळला जातो. आता हे दोन्ही संघ फुटबॉलच्या मैदानावर आमनेसामने येत आहेत.
या दोन संघांमध्ये येथे रविवारी मैत्रीपूर्ण सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यामुळे नऊ वर्षांनी पुन्हा या संघांमधील क्रीडा संबंधांना सुरुवात होत आहे. यापूर्वी २००५मध्ये भारतीय संघ पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळला होता. या दोन संघांमध्ये दोन सामने आयोजित केले जात आहेत. २३ वर्षांखालील खेळाडूंमध्ये या लढती होत आहेत. दुसरा सामना २० ऑगस्ट रोजी होणार आहे. ‘‘दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असून घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा आम्हाला मिळेल,’’ असे भारताचे प्रशिक्षक विम कोव्हरमन्स म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Aug 2014 रोजी प्रकाशित
भारत-पाकिस्तान फुटबॉलच्या मैदानावर आमनेसामने
भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील कोणताही सामना नेहमीच उत्कंठापूर्ण वातावरणात खेळला जातो.
First published on: 17-08-2014 at 05:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India pakistan to play football