India Schedule 2024: २०२३हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी चढ-उतारांनी भरलेले होते. दोन वेळा टीम इंडिया आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ आली, पण अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. असे असतानाही भारताने सर्वोत्कृष्ट संघ म्हणून विश्वचषकावर वर्चस्व राखले. आता भारताला २०२४ मध्येही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. यंदा टी-२० विश्वचषक जिंकून भारतीय संघ दशकभराचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

यंदा भारताला इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांबरोबर खेळायचे आहे. बीसीसीआयने वर्षभराचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले नाही, परंतु भारतीय खेळाडूंचे जूनपर्यंतचे वेळापत्रक स्पष्ट झाले आहे. यानंतर, भारताला २०२५ मध्ये होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपसाठी द्विपक्षीय मालिका खेळायची आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: बुमराह वि कोहलीमध्ये जसप्रीतने मारली बाजी, आयपीएलमध्ये पाचव्यांदा केलं विराटला आऊट, पाहा VIDEO
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

वर्षातील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे

२०२४ मध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेनंतर येथे कसोटी मालिका खेळवली जात आहे. भारत या दौऱ्यातील शेवटचा सामना २०२४ मध्ये ३ जानेवारीपासून खेळणार आहे. हा सामना ७ जानेवारीला संपणार आहे.

हेही वाचा: T20 World Cup: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयात कोणता संघ अडथळा ठरेल? गौतम गंभीरने केले सूचक वक्तव्य

अफगाणिस्तानबरोबर पहिली द्विपक्षीय मालिका

११ जानेवारीपासून टीम इंडियाला अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. दोन्ही संघांमधील ही पहिली द्विपक्षीय मालिका असेल. दोन्ही देशांदरम्यान जरी कसोटी सामना झाला असला तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि आशिया चषक स्पर्धांमध्येच खेळले आहेत.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका

यंदा भारतीय संघाला इंग्लंडबरोबर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होऊन ११ मार्चला संपणार आहे. सुमारे दोन महिने चालणारी ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

एप्रिल-मे मध्ये आयपीएल स्पर्धा

इंग्लंडविरुद्धच्या दीर्घ कसोटी मालिकेनंतर सर्व खेळाडू काही दिवस विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर आयपीएल सुरू होईल. दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेत झटपट क्रिकेटचा थरार शिखरावर असेल.

हेही वाचा: Venkatesh Prasad: कोहलीपासून ते शमीपर्यंत; व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितली २०२३ सालातील सर्वोत्तम-५ कामगिरी, जाणून घ्या

जूनमध्ये टी२० विश्वचषक विजेतेपद

टी-२० विश्वचषक २०२४ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ४ ते ३० जून दरम्यान होणार आहे. आयपीएलनंतर, सर्व संघांच्या बहुतेक खेळाडूंना टी-२० क्रिकेटची सवय होईल आणि विश्वचषकाचा उत्साह शिगेला असेल.

भारत जुलैपासून द्विपक्षीय मालिका खेळणार आहे

भारतीय संघाच्या एफ. टी. पी. चक्रानुसार, २०२४मध्ये टीम इंडिया इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. यातील इंग्लंडबरोबरची मालिका जानेवारी ते मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर इतर देशांविरुद्धची मालिका जुलै ते डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने पुढील वेळापत्रक जाहीर केले नाही, परंतु एफटीपी चक्रावरून हे स्पष्ट झाले आहे की भारताला वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांत श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळायच्या आहेत. या मालिकांमध्ये वन डे आणि कसोटी सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. कारण, २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय फॉरमॅटमध्ये होणार आहे आणि २०२५ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तिसरी फायनलही होणार आहे. हे लक्षात घेऊन भारताला आपली तयारी अधिक मजबूत करायची आहे.