आयसीसीच्या महत्वाकांक्षी स्पर्धेपैकी एक मानल्या जाणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला विश्वचषक संपल्यानंतर सुरुवात होणार आहे. कसोटी क्रमवारीतले अव्वल ९ संघ एकमेकांविरोधात घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर सामने खेळणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघासमोर पहिलं आव्हान वेस्ट इंडिजच्या संघाचं असणार आहे. विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघ कॅरेबियन बेटांकडे रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ३ टी-२० सामन्यांपैकी २ टी-२० सामने हे अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरात खेळवले जातील.

३ ऑगस्टपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार असून, २२ ऑगस्टपासून भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात करेल.

अवश्य वाचा – टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याची घोषणा, वेळापत्रकही जाहीर

असा असेल भारताच्या विंडीज दौऱ्याचा कार्यक्रम –

पहिला टी-२० सामना – ३ ऑगस्ट : (फ्लोरिडा, अमेरिका)
दुसरा टी-२० सामना – ४ ऑगस्ट : (फ्लोरिडा, अमेरिका)
तिसरा टी-२० सामना – ६ ऑगस्ट : (गयाना)
—————————————————————-
पहिला वन-डे सामना – ८ ऑगस्ट : (गयाना)
दुसरा वन-डे सामना – ११ ऑगस्ट : (त्रिनिनाद)
तिसरा वन-डे सामना – १४ ऑगस्ट : (त्रिनिनाद)
—————————————————————–
पहिला कसोटी सामना – २२ ते २६ ऑगस्ट – (अँटीग्वा)
दुसरा कसोटी सामना – ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर – (जमैका)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – टीम इंडियाचं विश्वचषकानंतरच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर