श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी बिश्नोई, वेंकटेश, पटेल यांचे स्थान धोक्यात

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

भारताचा अनुभवी डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजा तीन महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात जडेजाचा भारतीय संघातील समावेश निश्चित मानला जात असून लेगस्पिनर रवी बिश्नोई, अष्टपैलू वेंकटेश अय्यर अथवा मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेल यांच्यापैकी एकाला वगळण्यात येईल.

भारत-श्रीलंका यांच्यात अनुक्रमे २४, २६ आणि २७ फेब्रुवारीला तीन ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येतील. त्यानंतर उभय संघांत दोन कसोटीही होणार आहेत. कानपूर येथे नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात जडेजाने भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला आफ्रिका दौरा आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांना मुकावे लागले. ३३ वर्षीय जडेजा गतवर्षी विश्वचषकात नामिबियाविरुद्ध अखेरचा ट्वेन्टी-२० सामना खेळला आहे. संघ व्यवस्थापनाने जडेजाला नेहमीच प्रथम पसंतीचा अष्टपैलू म्हणून प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आता जडेजा पूर्णपणे तंदुरुस्त असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने नुकताच विंडीजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. या मालिकेत वेंकटेशने (९२ धावा, २ बळी) अष्टपैलू योगदान दिले, तर बिश्नोईने पदार्पणातच सामनावीर पुरस्कार पटकावून छाप पाडली. गोलंदाजीतील नावीन्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या हर्षलने हाणामारीच्या षटकांत टिच्चून मारा करतानाच तीन लढतींमध्ये पाच बळीही मिळवले. जडेजाच्या अनुपस्थितीत विविध पर्याय तयार झाल्यामुळे नेमके कुणाला वगळावे, असा प्रश्न कर्णधार रोहितला पडणार आहे.

चहर मुकणार

दीपक चहर दुखापतीमुळे मालिकेला मुकणार असून शार्दूल ठाकूरला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे सधाचे चित्र पाहता बिश्नोईलाच संघाबाहेर करून जडेजा आणि यजुर्वेद्र चहल या फिरकी जोडीसह भारतीय संघ मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जडेजा-शार्दूलमध्ये चुरस -बांगर

ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघातील प्रथम पसंतीचा अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर यांच्यात चुरस असेल, असे मत भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केले. ‘‘जडेजाच्या क्षमतेविषयी मला शंका नाही, मात्र शार्दूलने गेल्या वर्षभरात भारतासाठी तिन्ही प्रकारांत दिलेले योगदानही कौतुकास्पद आहे. या दोघांना एकत्रित खेळवल्यास भारताची फलंदाजी लांबेल. मात्र जडेजाला आता अव्वल कामगिरी करावी लागेल. अन्यथा शार्दूल परतल्यावर संघातील स्थानासाठीची चुरस अधिक तीव्र होईल,’’ असे बांगर म्हणाले.