ग्वेबेर्हा : पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात पावसाने हिरमोड केल्यानंतर आज, मंगळवारी होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यादरम्यानही संततधार अपेक्षित आहे. मात्र, ग्वेबेर्हा येथील सेंट जॉर्जेस पार्कच्या मैदानापासून पाऊस दूर राहील आणि आपल्याला सामना खेळण्याची संधी मिळेल अशी भारतीय संघातील युवा खेळाडूंना आशा असेल.

तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना रविवारी डरबन येथे खेळवला जाणार होता; परंतु सततच्या पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला. दुसऱ्या सामन्याच्या वेळीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, हा सामना खेळवला जाणे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार असून त्यापूर्वी भारताचे आता केवळ पाच ट्वेन्टी-२० सामने शिल्लक आहेत. त्यामुळे आता प्रत्येकच सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा >>> U-19 World Cup: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला, अंडर-१९ विश्वचषकाचे वेळपत्रक जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीने १७ खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिले आहे. मात्र, आता दोन सामन्यांत सर्व खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या युवकांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र, आता शुभमन गिलचे पुनरागमन झाल्याने या दोघांपैकी एकाला संघाबाहेर बसावे लागेल. दुसरा ट्वेन्टी-२० सामना ठरल्याप्रमाणे पार पडल्यास रिंकू सिंह, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांसारख्या युवकांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.

वेळ : रात्री ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या) रिंकू सिंह