IND vs ENG Live Streaming: भारताचा १९ वर्षांखालील संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघात ५ युथ वनडे सामन्यांची मालिका झाल्यानंतर आता ४ दिवसीय कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील दुसरा ४ दिवसीय कसोटी सामना चेम्सफोर्डमध्ये रंगणार आहे. भारतीय १९ वर्षांखालील संघाची जबाबदारी आयुष म्हात्रेकडे आहे. तर सर्वांची नजर १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीवर असणार आहे. वैभवने इंग्लंड दौऱ्यावर धुमाकूळ घातला आहे.
कुठे होणार हा सामना?
भारतीय १९ वर्षांखालील संघ आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ यांच्यातील दुसऱ्या ४ दिवसीय कसोटी सामन्याचा थरार चेम्सफोर्डच्या काऊंटी मैदानावर रंगणार आहे. या सामन्याचं नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता होईल. तर सामन्याला सुरूवात ३:३० वाजता होईल. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची जबाबदारी आयुष म्हात्रेकडे सोपवली गेली आहे. तर इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाची जबाबदारी थॉमस रीवकडे सोपवण्यात आली आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत बरोबरीची लढत पाहायला मिळाली आहे. भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या दोन्ही फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात आयुषने दमदार शतकी खेळी केली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
केव्हा आणि कुठे पाहता येणार लाईव्ह?
भारतीय १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघांमध्ये सुरू असलेल्या मालिकेचं थेट प्रक्षेपण हे कुठल्याही चॅनेलवर केलं जाणार नाही. हे सामने तुम्ही इंग्लंड क्रिकेट बोर्डच्या युट्यूब चॅनेलवर पाहू शकता. यासह सामन्याचे अपडेट्स तु्म्ही http://www.loksatta.com वर मिळवू शकता.
या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:
असा आहे भारतीय संघ – आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, कनिष्क चोहान, मौल्यराजसिंग चावडा, राहुल कुमार,आरएस अंबरीश, हरवंश पंगालिया (यष्टीरक्षर), विहान मल्होत्रा, अनमोलजीत सिंग, हेनिल पटेल, अभिज्ञान कुंडू, मोहम्मद एनान, प्रणव राघवेंद्र, दीपेश देवेंद्रन, युधाजीत गुहा, नमन पुष्पक.
असा आहे इंग्लंडचा संघ – थॉमस रीव (कर्णधार), रॉकी फ्लिंटॉफ, राल्फी अल्बर्ट, विल बेनिसन, एडम थॉमस, अॅलेक्स फ्रेंच, बेन डॉकिन्स, एलेक्स ग्रीन, आर्यन सावंत, जय सिंग, जो हॉकिन्स, जॅक होम, बेन मेयस, जेम्स मिंटो.