पीटीआय, इंदूर

भारताचा अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना रविवारी होणार असून यावेळी संघाचा प्रयत्न मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचा असणार आहे. या सामन्यात अनेक खेळाडू चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असतील. भारताने मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात सहा गडी राखून विजय मिळवला होता. या विजयामुळे संघाने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन हे जून महिन्यात होणार आहे आणि त्याआधीची ही अखेरची आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका आहे. त्यामुळे भारताच्या खेळाडूंना उर्वरित दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. त्यामुळे अनेक खेळाडूंच्या कामगिरीकडेही यावेळी लक्ष राहील. विराट कोहलीदेखील या सामन्यात पुनरागमन करणार आहे. तसेच, पहिल्या सामन्यात धावचीत झालेल्या कर्णधार रोहित शर्माकडून या सामन्यात चांगली खेळीची अपेक्षा असणार आहे. रिंकू सिंहने गेल्या काही सामन्यात आपल्या कामगिरीने छाप पाडली आहे. त्यामुळे त्याच्याकडे सर्वाचे लक्ष राहील.

हेही वाचा >>>IND vs ENG : मुंबई इंडियन्सने पोस्टरमधून रोहित शर्माला वगळल्याने चाहते संतापले; म्हणाले…

जितेश, वॉशिंग्टन, अक्षरकडे लक्ष

जितेश शर्माला इशान किशनच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. त्याने संघासाठी काही उपयुक्त खेळीही केल्या आहेत व आपले स्थान निश्चित करण्यासाठी त्याचा प्रयत्न मोठी खेळी करण्याचा राहील. तिलक वर्माने गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांत ३९, ५१ व नाबाद ४९ धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतर खेळलेल्या १३ डावांत त्याला केवळ एकच अर्धशतक झळकावते आले आहे. विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाल्यानंतर तिलकला अंतिम अकरामध्ये स्थान मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे असेल. दुखापतीमुळे एकदिवसीय विश्वचषकात सहभागी न झालेल्या अक्षरला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत संघात स्थान देण्यात आले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने दोन गडी बाद केले होते. वॉशिंग्टन सुंदरने दुखापतीनंतर पुनरागमन केले, मात्र पहिल्या सामन्यात त्यांना छाप पाडता आली नाही.

हेही वाचा >>>विजयवीर सिद्धूने पटकावले रौप्य पदक! पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवणारा ठरला १७वा भारतीय खेळाडू

गुरबाझ, नबी, मुजीकडे नजर

अफगाणिस्तान संघालाही कमी लेखून चालणार नाही. कारण, त्यांच्याकडेही प्रतिभावंत खेळाडू आहेत. रहमानुल्ला गुरबाझ, अजमतुल्ला ओमरझाई आणि अनुभवी मोहम्मद नबी आक्रमक खेळी करण्यासा सक्षम आहेत. गोलंदाजीत रशीद खानच्या अनुपस्थितीतही अफगाणिस्तान संघाकडे मुजीब-उर-रहमान सारखा फिरकी गोलंदाज आहे. त्याला वेगवान गोलंदाज नवीन उल हक व फजलहक फारूकीचीही साथ मिळत आहे. हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न राहील.

विराटकडून अपेक्षा

भारताचा तारांकित खेळाडू विराट कोहली या सामन्यात संघात पुनरागमन करीत आहे. पहिल्या सामन्यात तो खेळला नव्हता. इंदूर येथील खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असते, त्यामुळे विराटच्या फलंदाजीकडे सर्वाचे लक्ष राहील. विराटही बराच काळ ट्वेन्टी-२० क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने चमकदार फलंदाजी केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात त्याने सहभाग नोंदवला होता. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील. तसेच, चाहतेही विराटला मैदानात पाहण्यासाठी उत्सुक असतील.

’ वेळ : सायं. ७ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.