India vs Australia T20I Series Schedule: तीन एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा २-१ च्या फरकानं पराभव केला आहे. तिसऱ्या सामन्यात १३ धावांनी जिंकत भारतानं लाज राखली आहे. एकदिवसीय सामन्याच्या मालिकेनंतर आता सर्वांचं लक्ष तीन सामन्याच्या टी-२० मालिकेकडे लागले आहे. तीन सामन्याची टी-२० मालिका पाच दिवसांत संपणार आहे.  पाहूयात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० सामने कधीपासून सुरु होणार आहेत. कुठे पाहाता येतील….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधी पाहाल सामना :
तिन्हीही टी-२० सामने दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी होणार आहेत.

कुठे आहेत सामने –
पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर २०२०, मनुका ओवल क्रिकेट ग्राउंड

दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर २०२०, सिडनी क्रिकेट ग्राउंड

तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर २०२०, सिडनी क्रिकेट ग्राउंड

कुठे पाहाल?
टी २० सामन्याचं लाइव्ह प्रसारण Sony Six, Sony TEN 1, आणि Sony TEN 3 वर होणार आहे. त्याशिवाय Sony Liv या अॅपवरही ऑनलाइन सामना पाहू शकता.

भारताचा टी-२० संघ –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी- नटराजन

टी-२० मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेला १७ डिसेंबर रोजी सुरुवात होणार आहे.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं लाईव्ह कव्हरेज पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉमला नक्की भेट द्या….

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs australia t20i series full schedule ind vs aus t20 matches timing and full information nck
First published on: 03-12-2020 at 10:09 IST