India vs Bangladesh Matches Live Streaming, Schedule and Teams: भारत आणि बांगलादेशमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका भारतात खेळवली जाणार आहे. उभय संघांमधील कसोटी मालिका येत्या १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ प्रदीर्घ विश्रांतीनंतर कसोटी सामन्यांमध्ये पुनरागमन करत आहे. तर बांगलादेश संघ पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप देऊन पुढील सामने खेळण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे ही कसोटी मालिका खूपच रोमांचक असणार आहे. दोन्ही संघांकडून कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर झाला आहे.

IND vs BAN Test Series: पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघ

sreeleela doing item song in pushpa 2 movie
श्रद्धा कपूरने नाकारली ‘पुष्पा २’ ची ऑफर, आता ‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Atul Save, chandrakant khaire
ठाकरेंच्या बंडखोराची माघार, काँग्रेसऐवजी भाजपा सुखावली, अतुल सावेंनी थेंट खैरेंचे पाय धरले; औरंगाबादमध्ये काय घडतंय?
AUS vs PAK Fans Make Fun Of Mohammad Rizwan As He Holds Pat Cummins' Hand
AUS vs PAK : ‘प्लीज मला हरवू नकोस हां…’, पॅट कमिन्सच्या हातावर हात ठेवल्याने मोहम्मद रिझवान ट्रोल, मीम्सना उधाण
IND vs SA T20I Series Full Schedule With Date and Time with IST And Squads India South Africa
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 movie second day collection
Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : दुसऱ्या दिवशीही ‘सिंघम अगेन’ ‘भुल भुलैया ३’वर पडला भारी, तीन दिवसांतच १०० कोटींची कमाई करणार अजय देवगणचा चित्रपट
Titeekshaa Tawde Nashik Home Tour
Video : तितीक्षा तावडेचं सासरचं घर पाहिलंत का? दिवाळीच्या दिवशी दाखवली घराची झलक; दारावर आहे खास नेमप्लेट

भारतीय संघ (पहिल्या कसोटीसाठी):

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, यश दयाल

हेही वाचा – Ravichandran Ashwin: “गेल्या ३-४ वर्षांपासून मी खूप…”, बांगलादेशविरूद्धच्या कसोटीपूर्वी रवीचंद्रन अश्विनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

बांगलादेश कसोटी संघ:

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मेहदी हसन जेड, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), लिटन कुमार दास (यष्टीरक्षक), तैजुल इस्लाम, नईम हसन, हसन महमूद , तस्किन अहमद, नाहिद राणा, सय्यद खालिद अहमद, जेकर अली अनिक

हेही वाचा – Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकाने मैदान गाजवलं, ९ विकेट्स घेत अर्जुनने संघाला मिळवून दिला विजय, पाहा VIDEO

India vs Bangladesh Test Series Schedule: भारत वि बांगलादेश कसोटी मालिकेचे वेळापत्रक

भारत वि बांगलादेश – पहिला कसोटी सामना – सकाळी ९ वा. – चेन्नई
भारत वि बांगलादेश – दुसरा कसोटी सामना – सकाळी ९ वा. – कानपूर

India vs Bangladesh T20 Series Schedule: भारत वि बांगलादेश टी-२० मालिकेचे वेळापत्रक

भारत वि बांगलादेश – पहिला टी-२० सामना – संध्याकाळी ७ वा. – ग्वालियर
भारत वि बांगलादेश – दुसरा टी-२० सामना – संध्याकाळी ७ वा. – दिल्ली
भारत वि बांगलादेश – तिसरा टी-२० सामना – संध्याकाळी ७ वा. – हैदराबाद

हेही वाचा – Younis Khan: “खेळण्यापेक्षा बडबडच जास्त…”, बाबर आझमला सुनावताना पाकिस्तानच्या युनूस खानने विराट कोहलीबाबत केलं मोठं वक्तव्य

IND vs BAN मालिकेचे सामने भारतात कोणत्या स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार?
भारत वि. बांगलादेशमधील कसोटी, टी-२० सामने स्पोर्ट्स 18 चॅनेलवर टीव्हीवर लाईव्ह पाहता येतील.

IND vs BAN मालिकेचे सामने भारतात कोणत्या अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार?
भारत वि. बांगलादेशमधील कसोटी, टी-२० सामने Jio Cinema अ‍ॅपवर लाईव्ह पाहता येतील.