भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यामध्ये सलामीवीर के. एल. राहुल पुन्हा एकदा स्वस्तात तंबूत परतला. भारताने प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर पाच मिनिटांच्या आत राहुल तंबूत परतल्याने भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्राने संताप व्यक्त केला आहे.

नक्की पाहा >> Ind vs Eng: ६ धावा करणाऱ्या पंतच्या एका निर्णयानं भारताला मिळाल्या १० धावा, सर्वांकडून होतंय कौतुक; पाहा Video

नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल फलंदाजीला मैदानात उतरल्यानंतर सामन्याच्या १० व्या चेंडूवर के. एल. राहुल झेलबाद झाला. ख्रिस वोक्सच्या बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात के. एल. राहुल यष्टीरक्षक जॉस बटलरकरवी झेलबाद झाला. के. एल. राहुल झेलबाद झाल्याने अनेकांनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे. अमित मिश्रानेही ट्वीटरवरुन आपला संताप व्यक्त करत राहुल म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी फसवणूक असल्याचं म्हटलंय.

नक्की वाचा >> Ind vs Eng: २८ चेंडूंमध्ये २७ धावा! ‘टी-२० मध्ये कसोटी खेळणाऱ्या रोहितचं अभिनंदन’; ‘हिटमॅन’च टार्गेटवर, चाहत्यांना संताप अनावर

“मी कारणाशिवाय के. एल. राहुलला सर्वात मोठा फ्रॉड म्हणत नाही. त्याला महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आणि तणावाखाली नीट खेळता येत नाही. त्याच्या या उत्तम कामगिरी न करण्यामुळे तो संघाला दबावात टाकतो,” असं अमित मिश्राने म्हटलं आहे. “के. एल. राहुल हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठा फ्रॉड आहे,” असं मिश्राने ट्वीट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

के. एल. राहुलने गेल्या दोन सामन्यांत अर्धशतके करत सूर गवसल्याची ग्वाही दिली होती मात्र आज पुन्हा त्याला अपयश आलं. पाच चेंडूंमध्ये एका चौकासहीत पाच धावा करत राहुल तंबूत परतला.