England tour of india 2021 : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पाच फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. चार सामन्याच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथील मैदानावर रंगणार आहेत. या कसोटी मालिकेत विराट कोहलीला माजी कर्णधार एम. एस. धोनी याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एम.एस.  धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर भारतीय संघानं प्रत्येकी ९-९ वेळा कसोटी मालिका जिंकल्या आहेत. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यास विराट कोहली धोनीचा हा विक्रम मोडीत काढेल. घरच्या मैदानावर धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं २१ कसोटी सामने जिंकले आहेत. तर कोहलीनं २० सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत धोनीचा हा विक्रमही मोडीत काढण्याची संधी विराट कोहलीकडे आहे.

आणखी वाचा- IND vs ENG : पहिल्या कसोटीसाठी जाफरने निवडला संघ, या खेळाडूला संधी देत दिला धक्का

धोनीचे दोन्ही विक्रम मोडीत काढल्यास घरच्या मैदानावर सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर नवीन विक्रम होईल. सध्या धोनी पहिल्या आणि विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद अजहरुद्दीन तर चौथ्या क्रमांकावर सौरव गांगुली आहे. अजहरुद्दीनच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर १३ कसोटी सामन्यात भारतानं विजय मिळवला तर गांगुलीच्या नेतृत्वात १० कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england test series indian captains to win most tests in home virat kohli might break ms dhoni s big captaincy record nck
First published on: 02-02-2021 at 11:01 IST