India vs South Africa 1st Test Day 2 live Score: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर दक्षिण आफ्रिकचा डाव १५९ धावांवर आटोपला. दरम्यान पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने १ गडी बाद ३७ धावा केल्या. सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.
IND vs SA Live: भारतीय संघाचे ६ फलंदाज तंबूत! रवींद्र जडेजा परतला माघारी
भारतीय संघाचे ६ फलंदाज तंबूत परतले आहेत. रवींद्र जडेजा २७ धावांवर बाद झाला आहे.
IND vs SA Live Score: भारताचा निम्मा संघ तंबूत
भारतीय संघाला पाचवा धक्का बसला आहे. ध्रुव जुरेल अवघ्या १४ धावांवर माघारी परतला.
India vs South Africa Live: भारतीय संघाला चौथा मोठा धक्का! नको तो फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंत बाद
ऋषभ पंतने काही आकर्षक फटके मारले होते. पण त्याला २७ धावांवंर माघारी परतावं लागलं आहे.
IND vs SA Live: केएल राहुल परतला माघारी
भारतीय संघाला तिसरा धक्का बसला आहे. केएल राहुल ३९ धावा करत माघारी परतला आहे.
IND vs SA Live: भारतीय संघाच्या १०० धावा पूर्ण
भारतीय संघाने ३८ व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंतची जोडी मैदानावर आहे.
IND vs SA Live: शुबमन गिलने अचानक सोडलं मैदान! नेमकं काय घडलं?
गिलने चौकार मारून आपलं खातं उघडलं. चौकार मारण्यासाठी त्याने स्विप शॉट मारला. यादरम्यान त्याच्या मानेला दुखापत झाली. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतावं लागलं आहे.
IND vs SA Live: भारतीय संघाला दुसरा धक्का
भारतीय संघाला दुसरा धक्का बसला आहे. वॉशिंग्टन सुंदर २९ धावांची खेळी करून माघारी परतला आहे.
IND vs SA Live: केएल राहुलच्या ४००० धावा पूर्ण
भारतीय कसोटी संघातील प्रमुख फलंदाजाची भूमिका पार पाडत असलेल्या केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या आहेत.
