भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका कसोटी मालिकेला आजपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर सुरूवात झाली आहे. करोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या सावटाखाली ही मालिका होत असून, प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत पहिली कसोटी पार पडत आहे.
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरली आहे. विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर, के एल राहुल आणि मयंक अग्रवाल ही सलामीची जोडी देखील मैदानात उतरलेली आहे.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. मात्र, यावेळी विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इतिहास रचून कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारताने १९९२मध्ये पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता.
भारताचा संघ –
केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर या खेळाडूंचा समावेश आहे.
दक्षिण अफ्रिकेचा संघ –
डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॉसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, क्विंटन डी कॉक, विआन मुल्डर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.