India vs South Africa Women’s World Cup 2025 Final: वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर भारताच्या लेकींनी नाव कोरलं आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ २४६ धावा करू शकला. यासह भारताने ५२ धावांनी पहिल्यांदाच जेतेपद नावावर केलं आहे. भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलंं आहे. यापूर्वी २००५ आणि २०१७ साली भारताने अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण तिसऱ्यांदा भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं. दरम्यान आता अमनज्योत कौरचा मॅच संपल्यानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेच्या फायनल सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या २९९ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दिमाखात सुरुवात केली. पहिली काही षटके सावध फलंदाजी केल्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर अचानक आक्रमण केलं. नवव्या षटकांत आफ्रिकेचा डाव बिनबाद पन्नाशीपार पोहोचला होता. त्यामुळे भारतीय संघावरील दडपण वाढत होतं. त्याचवेळी अमनज्योत कौरने उत्तम क्षेत्ररक्षण करीत सुरेख फलंदाजी करणाऱ्या तॅझमिन बिट्सला धावबाद केलं.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेडयममधले प्रेक्षक तिला “तू तर फाडून टाकलंस,” “खूप छान खेळलीस” अशी प्रतिक्रिया देत आहेत. यावर ती सुद्धा प्रेक्षकांना उत्साहाने प्रतिसाद देत लांबूनच मिठी मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अमनज्योत कौरचे सर्वच चाहते खूश झाले आहेत. कोणताही इगो न दाखवता अगदी थांबून ती आपल्या फॅन्सना प्रतिक्रिया देत आहे म्हणत सर्वत तिचं कौतुक करत आहेत. “म्हारी छोरियाँ छोरों से बिल्कुल भी कम नही है जी! भारत माता की जय!”, सं”पूर्ण भारताकडून तुम्हाला अभिमानाची मिठी” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता नेटकरी देत आहेत.
पाहा व्हिडीओ
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू
- लॉरा वोल्वाडने ५८४ धावा – २०२५ विश्वचषक
- एलिसा हिली ५०९ धावा २०२२ विश्वचषक
- रॅचेल हेन्स ४९७ धावा २०२२ विश्वचषक
- डेबी हॉकले ४५६ धावा १९९७ विश्वचषक
डीवाय आहे बालेकिल्ला
२०२२ मध्ये भारतीय संघाने या मैदानावर दोन सामने खेळले होते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका याच मैदानात खेळली होती. भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. गेल्या वर्षअखेरीस याच मैदानावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळली होती. भारताने या मालिकेत विजय मिळवला होता.याच मैदानावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकाही खेळली होती. दोन वर्षांपूर्वी याच मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना झाला होता. भारतीय संघाने तब्बल ३४७ धावांनी हा सामना जिंकला होता. या मैदानाची, खेळपट्टीची, वातावरणाची भारतीय संघाला चोख माहिती आहे.
