India vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Live Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या ३३व्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला आहे. भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सलग सातवा सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने ३५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १९.४ षटकांत ५५ धावांवर गारद झाला.
CWC 2023 India vs Sri Lanka Highlights in Marathi: भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सलग सातवा सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ३३वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात २ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ३०२ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. सामन्यादरम्यान भारतीय फलंदाजांपाठोपाठ भारतीय गोलंदाजही जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. यामुळेच ३५८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १३.२ षटकात अवघ्या ५५ धावांवर गडगडला.
शमीला पाचवी विकेट मिळाली
मोहम्मद शमीला पाचवी विकेट मिळाली. शमी आपल्या गोलंदाजीने कहर करत आहे. श्रीलंकेने 49 धावांवर 9वी विकेट गमावली.
श्रीलंकेच्या 29 धावांत आठ विकेट पडल्या आहेत. मोहम्मद शमीने मॅथ्यूजला क्लीन बोल्ड केले. या सामन्यातील शमीचे हे चौथे यश आहे. या विश्वचषकात त्याने प्रत्येक सामन्यात किमान चार विकेट्स घेतल्या आहेत. मॅथ्यूजने 25 चेंडूत 12 धावा केल्या. तो संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे.
22 धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेची सातवी विकेट पडली. दुष्मंथा चमीरा खाते न उघडताच बाद झाला. त्याने सहा चेंडूंचा सामना केला आणि लेगस्टंपच्या बाहेरील चेंडूवर राहुलने त्याचा झेल घेतला. हा चेंडू खूपच खराब होता, पण सुदैवाने यातही शमीला एक विकेट मिळाली.
श्रीलंकेच्या 6 विकेट पडल्या आहेत. मोहम्मद शमीने 10व्या ओव्हरमध्ये येताच दोन विकेट घेतल्या. श्रीलंकेने 14 धावांत 6 विकेट गमावल्या आहेत. भारत लवकरच वनडेमधला सर्वात मोठा विजय नोंदवू शकतो.
https://twitter.com/Saurav_Roy_06/status/1720081240425128256
मोहम्मद सिराजने कुसल मेंडिसला बाद केले. आता श्रीलंकेची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात ७ धावा आहे. श्रीलंकेचे ३ फलंदाज शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. मोहम्मद सिराजला आतापर्यंत ३ यश मिळाले आहे. तर जसप्रीत बुमराहच्या नावावर १ विकेट आहे.
https://twitter.com/EnjoyKids492998/status/1720073220911689880
श्रीलंकेच्या संघाला तिसरा झटका बसला. मोहम्मद सिराजने सदिरा समरविक्रमाला बाद केले. सदीरा समरविक्रमा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतली. आतापर्यंत श्रीलंकेचे तीनही फलंदाज शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. श्रीलंकेची धावसंख्या ३ गड्यांच्या मोबदल्यात २ धावा आहे. मोहम्मद सिराजला भारतासाठी २ विकेट मिळाल्या, तर जसप्रीत बुमराहच्या नावावर १ विकेट आहे.
https://twitter.com/AbhayYadav1520/status/1720069956224848105
दिमुथ करुणारत्ने पॅव्हेलियनमध्ये परतला
मोहम्मद सिराजने श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. पथुम निशांकानंतर दिमुथ करुणारत्ने पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. दोन्ही सलामीवीरांना खातेही उघडता आले नाही. श्रीलंकेची धावसंख्या २ गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा आहे.
https://twitter.com/Sheikhhumza49/status/1720068855572451690
358 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य मिळालेल्या श्रीलंकेने पहिल्याच चेंडूवर पाथुम निसांकाला गमावलं. जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर निसाकांला पायचीत केलं.
विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या तिघांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ३५७ धावांची मजल मारली. विराट कोहलीने ८८ तर शुबमन गिलने ९२ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरने ८२ धावांची खेळी केली. श्रीलंकेतर्फे दिलशान मधुशनकाने ५ विकेट्स पटकावल्या.
श्रेयस अय्यर ८२ धावांची खेळी करुन परतला. श्रेयसने ३ चौकार आणि ६ षटकारांसह ही खेळी सजवली. दिलशान मधुशनकाने श्रेयसला बाद करत डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली.
श्रीलंकेविरुद्धच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या लढतीत भारताने तीनशे धावांचा टप्पा ओलांडला आहे.
उसळत्या चेंडूचा सामना करताना विकेट गमावणाऱ्या श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक पूर्ण केलं. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या श्रेयसने महेश तीक्षणाच्या गोलंदाजीवर चौकार लगावत अर्धशतक गाठलं. स्पर्धेतील अन्य संघ श्रेयस अय्यर फलंदाजीला आल्यावर उसळत्या चेंडूचा मारा करतात. श्रीलंकेने हे धोरण अवलंबलं नाही. सामन्यापूर्वी झालेल्या सराव सत्रांमध्ये श्रेयसने कोच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला होता. श्रेयस फॉर्मात येणं ही भारतीय संघासाठी सकारात्मक गोष्ट आहे.
वर्ल्डकपमध्ये दमदार प्रदर्शन करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशनकाने मुंबईकर सूर्यकुमार यादवला तंबूत धाडलं. मधुशनकाचा उसळता चेंडू हूक करण्याचा सूर्यकुमारचा प्रयत्न होता. हे करताना चेंडू सूर्यकुमारच्या बॅटला स्पर्श करून विकेटकीपरच्या ग्लोव्जमध्ये जाऊन विसावला. चेंडू खांद्याला लागून विकेटकीपरकडे गेल्याचं सूर्यकुमारला वाटलं, म्हणून त्याने रिव्ह्यू घेतला. मात्र रिप्लेत चेंडू बॅटला लागल्याचं स्पष्ट झालं. सूर्यकुमारला १२ धावाच करता आल्या.
दुश्मंत चमीराच्या चेंडूवर के.एल.राहुल हेमंताच्या हाती झेल सोपवून बाद झाला. त्याने २१ धावा केल्या. राहुल-श्रेयस यांची जोडी भारताला तीनशेचा टप्पा ओलांडून देईल अशी चिन्हं होती. पण चमीराच्या सातत्यपूर्ण गोलंदाजीसमोर राहुलचा बचाव तोकडा पडला.
विराट कोहली आणि शुबमन गिल ठराविक अंतरात बाद झाल्यानंतर के.एल.राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली आहे. उसळत्या चेंडूवर बाद होत असलेल्या श्रेयसने या त्रुटीवर काम केल्याचं जाणवलं. वानखेडे मैदानाचा छोटा आकार आणि दवाची शक्यता लक्षात घेऊन साडेतीनशेपर्यंत मजल मारण्याचं भारतीय संघाचं लक्ष्य आहे.
विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी साकारलेल्या १८९ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारताने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला.
विराट कोहली वानखेडे मैदानावर वनडेत सचिन तेंडुलकरच्या ४९व्या शतकाची बरोबरी करणार असं दिसत होतं. मात्र दिलशान मधुशनकाच्या स्लोअरवन चेंडूवर कोहली बाद झाला. कोहलीने ११ चौकारांसह ८८ धावांची शानदार खेळी केली. मधुशनकाचा चेंडू थांबून कोहलीच्या बॅटवर पोहोचला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात पाथुम निसाकांने झेल टिपताच मैदानात शांतता पसरली.
यंदाच्या वर्षात भन्नाट फॉर्मात असलेल्या शुबमन गिलचं वर्ल्डकपमधलं पहिलं शतक थोडक्यात हुकलं. दिलशान मधुशनकाच्या गोलंदाजीवर गिल ९२ धावांवर बाद झाला. त्याने ११ चौकार आणि २ षटकारांसह ही खेळी साकारली होती.
भारताच्या डावातील 24 षटके पूर्ण झाली आहेत. भारताची धावसंख्या एक विकेट गमावून 140 धावा आहे. विराट कोहली 67 धावा करून क्रीजवर उपस्थित आहे. शुबमन गिलनेही 60 धावा केल्या आहेत. भारताची नजर मोठ्या धावसंख्येकडे लागली आहे.
शुबमन गिलचे अर्धशतकही पूर्ण झाले आहे. शुबमन गिलने 55 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. गिलच्या खेळीत 8 चौकारांचा समावेश होता. विराट 53 धावा करून दुसऱ्या टोकाला खेळत आहे. 19 षटकांनंतर भारताची धावसंख्या एक विकेट गमावून 119 धावा आहे.
विराट कोहलीचे अर्धशतक
विराट कोहलीने 50 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 70 वे अर्धशतक होते. यासह या दोघांनी भारताची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली आहे. 17 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 106 धावा आहे. विराट 52 धावा करून आणि शुभमन 40 धावा करून क्रीजवर आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 102 धावांची भागीदारी झाली आहे.
आशिया कप २०२२ नंतर विराटने हरवलेला फॉर्म परत मिळवला आहे. त्याआधी विराट सुमारे अडीच वर्षे सतत फ्लॉप होत होता आणि एकही शतक त्याला झळकावता आले नाही, पण आता विराटच्या बॅट चांगली तळपत आहे. तो प्रत्येक सामन्यात धावा करत आहे. आज विराट कोहलीने ३४ धावा करताच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात आठ वेळा १००० धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज बनला आहे. त्याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरने १९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३ आणि २००७ साली १००० धावांचा टप्पा पार केला होता.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1720010448597393892
कर्णधार रोहित शर्माची विकेट लवकर पडल्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिलने टीम इंडियाचा डाव सांभाळला. 9व्या षटकात 50 धावा पूर्ण झाल्या. षटक संपल्यानंतर धावसंख्या एका विकेटवर 57 धावा आहे. गिल 25 तर कोहली 26 धावांवर खेळत आहे.
https://twitter.com/Hjtalkscricket/status/1720009248434946264
भारताने 6 षटकांनंतर एक विकेट गमावत ३३ धावा केल्या. विराट कोहली १८ चेंडूत २२ धावा केल्यानंतर खेळत आहे. त्याने 2 चौकार मारले आहेत. शुबमन 12 चेंडूत 9 धावा करून खेळत आहे. शुबमननेही दोन चौकार मारले आहेत. श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने एक विकेट घेतली.
भारताने 3 षटकांनंतर एक विकेट गमावून 14 धावा केल्या. शुबमन गिलने 7 चेंडू खेळले आहेत, मात्र त्याला खातेही उघडता आलेले नाही. विराट कोहली 9 चेंडूत 9 धावा केल्यानंतर खेळत आहे. त्याने 2 चौकार मारले आहेत.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात बाद झाला आहे. कर्णधाराने पहिल्या चेंडूवर चौकार मारून खाते उघडले आणि दुसऱ्या चेंडूवर दिलशान मदुशंकाच्या चेंडूवर बाद झाला. रोहित शर्मा ४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
दोन्ही संघंची प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे -
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
https://twitter.com/BCCI/status/1719989011664814112
श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (कर्णधार/यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, दुशान हेमंथा, अँजेलो मॅथ्यूज, महिष तिक्षना, कसून राजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका.
श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. धनंजय डी सिल्वाच्या जागी फिरकीपटू दुशान हेमंताचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्माने इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच श्रेयस अय्यर, सूर्यकुमार आणि शमी खेळताना दिसणार आहेत.
१२ वर्षांपूर्वी याच वानखेडे स्टेडियमच्या मैदानावर भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करून विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. विश्वचषक २०११ चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात बरोबरीचा झाला होता, परंतु यावेळी ही स्पर्धा मानली जात नाही. भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे तर श्रीलंकेचा संघ पराभवाने हैराण झाला आहे. भारतीय संघाला आतापर्यंत कोणत्याही संघाविरुद्ध पराभव पत्कारावा लागलेला नाही. त्याचबरोबर प्रत्येक विभागात शानदार कामगिरी केली आहे.