India Vs Sri Lanka: टी २० मालिकेतील अंतिम सामना; कोण मारणार बाजी?

भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेतील अंतिम सामना आज रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी आहे.

India-Vs-Srilanka
India Vs Sri Lanka: टी २० मालिकेतील अंतिम सामना (Image Credit: Twitter/@OfficialSLC)

भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेतील अंतिम सामना आज रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. श्रीलंकेतील प्रेमदासा मैदानावर अंतिम सामना रंगणार आहे. श्रीलंका दौर्‍यावर वनडे मालिका २-१ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी आहे. दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला गंभीर दुखापत झाल्याने आजच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. नवदीप सैनीने दुसऱ्या टी २० सामन्यात गोलंदाजी केली नव्हती.

दोन्ही संघ

भारतः शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौथम, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डि सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरित असालांका, वानिदू हसरंगा, असीन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुश्मंथा संदाकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कधी सुरू होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम टी-२० सामना गुरूवारी २९ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कुठे होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम टी-२० सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कुठे पाहता येईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-२०सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-२०सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग आपण सोनी लिव्हवर पाहू शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs sri lanka t20 series final rmt