आज विंडीजविरुद्ध तिसऱ्या सामन्यात धवनचे पुनरागमन निश्चित

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Yuzvendra Chahal become third highest wicket taker for Rajasthan Royals
IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

सलग दोन दिमाखदार विजयाची नोंद केल्यानंतर शुक्रवारी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासह मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याच्या निर्धाराने भारताचे खेळाडू मैदानात उतरतील. अनुभवी सलामीवीर शिखर धवनचे या लढतीसाठी भारतीय संघातील स्थान पक्के मानले जात आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अहमदाबाद येथे झालेल्या दोन सामन्यांत अनुक्रमे सहा गडी आणि ४४ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. धवनच्या अनुपस्थितीत भारताने इशान किशन आणि ऋषभ पंत यांना सलामीला फलंदाजीची संधी दिली. परंतु आता धवन करोनातून सावरला असून रोहितने दुसऱ्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यानच त्याचा पुढील लढतीत समावेश करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे धवन-रोहित ही अनुभवी जोडी पुन्हा सलामीला खेळताना दिसेल

दुसरीकडे, कर्णधार किरॉन पोलार्ड या लढतीत परतण्याची शक्यता असल्याने विंडीजला दिलासा मिळणार आहे. विंडीजच्या संघाला गेल्या १७ पैकी ११ सामन्यांत पूर्ण ५० षटके फलंदाजी करण्यात अपयश आले आहे. किमान तिसऱ्या लढतीत दमदार कामगिरी करून मालिकेचा शेवट गोड करण्यास विंडीजचे खेळाडू उत्सुक असतील. उभय संघांतील ट्वेन्टी-२० मालिकेला १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ होईल.

श्रेयसही संधीच्या प्रतीक्षेत

मुंबईकर श्रेयस अय्यर आणि महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड हे दोघेसुद्धा करोनातून सावरले असून त्यांना सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु तिसऱ्या सामन्यासाठी त्यांना भारतीय संघात स्थान मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. धवनच्या समावेशामुळे दीपक हुडाला संघातील स्थान गमवावे लागेल, असे दिसते. राहुल आणि पंत मधल्या फळीत फलंदाजी करतील. विराट कोहलीच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा अद्याप कायम असून त्याला या लढतीत अधिक मुक्तपणाने फलंदाजी करण्याची संधी आहे.

कुलदीप, बिश्नोईत चुरस

भारताने मालिका आधीच खिशात घातल्यामुळे तिसऱ्या लढतीत यजुर्वेद्र चहल किंवा वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूंपैकी एकाला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यांच्या जागी कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांपैकी एका मनगटी फिरकीपटूला संधी मिळेल. प्रसिध कृष्णाने गेल्या सामन्यात चार बळी मिळवून लक्ष वेधले. त्याचे संघातील स्थान पक्के मानले जात असून शार्दूल ठाकूरच्या जागी दीपक चहरला खेळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

ऋतुराज, श्रेयसही संधीच्या प्रतीक्षेत

मुंबईकर श्रेयस अय्यर आणि महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड हे दोघेसुद्धा करोनातून सावरले असून त्यांना सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु तिसºया सामन्यासाठी त्यांना भारतीय संघात स्थान मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. धवनच्या समावेशामुळे दीपक हुडाला संघातील स्थान गमवावे लागेल, असे दिसते. राहुल आणि पंत मधल्या फळीत फलंदाजी करतील. विराट कोहलीच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा अद्याप कायम असून त्याला या लढतीत अधिक मुक्तपणाने फलंदाजी करण्याची संधी आहे. मात्र दुसºया लढतीपेक्षा यावेळी भारतीय फलंदाजांकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.

कुलदीप, बिश्नोईत चुरस

भारताने मालिका आधीच खिशात घातल्यामुळे तिसºया लढतीत यजुर्वेंद्र चहर्ल ंकवा वर्ॉंशग्टन सुंदर या फिरकीपटूंपैकी एकाला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यांच्या जागी कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांपैकी एका मनगटी फिरकीपटूला संधी मिळेल. प्रसिध कृष्णाने गेल्या सामन्यात चार बळी मिळवून लक्ष वेधले. त्याचे संघातील स्थान पक्के मानले जात असून शार्दूल ठाकूरच्या जागी दीपक चहरला खेळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

संघ

’ भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चहर, शार्दूल ठाकूर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉिशग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आवेश खान, शाहरुख खान.

’ वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन अ‍ॅलन, एन्क्रुमा बोनर, डॅरेन ब्राव्हो, शमार ब्रूक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारियो शेपर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श.

’ वेळ : दुपारी १.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)