वॉरक्लॉ : वॉरक्लॉ येथे सुरू असलेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विुगणित करताना पाच सुवर्णपदकांवर नाव कोरले. रविवारी भारताच्या रीकव्‍‌र्ह संघांनी एकूण आठ पदकांची कमाई केली.

पुरुषांच्या १८ वर्षांखालील कॅडेट गटात अमित कुमार, विकी रुहाल आणि बिशाल चेंगमय यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने फ्रान्सवर ५-३ अशी मात केली. तर मिश्र दुहेरीतील अंतिम फेरीत कोमलिका बारी आणि पार्थ साळुंखे यांच्या जोडीने जपानच्या जोडीवर ६-२ असा विजय मिळवला. त्याशिवाय २१ वर्षांखालील गटात पार्थ साळुंखे, आदित्य चौधरी आणि धीरज बोमादेवारा या भारतीय रीकव्‍‌र्ह संघाने सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या कॅडेट गटात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं

कंपाऊंड आणि रीकव्‍‌र्ह अशा दोन विभागांत खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण आठ सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्यपदके जिंकली. भारताची ही या स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली.