काय सांगता..! लोकप्रिय बिग बॅश लीगमध्ये अजून एका भारतीय क्रिकेटपटूची ‘एन्ट्री’!

सिडनी सिक्सर्स संघाचे करणार प्रतिनिधित्व

Indian batting sensation shafali verma will play in womens big bash league
बिग बॅश लीग

भारताची महिला संघाची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा यावर्षी महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) मध्ये सिडनी फ्रेंचायझीचे प्रतिनिधित्व करेल. शफाली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियातील फ्रेंचायझी-आधारित टी-२० स्पर्धेत खेळेल.

 

हरियाणाची रोहतक येथे राहणारी १७ वर्षीय शफाली टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तिने २२ सामन्यात २९.३८च्या सरासरीने आणि १४८.३१च्या स्ट्राइक रेटने ६१७ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यात शफालीने २३, ४७ आणि ६० धावा केल्या.

भारताच्या टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या पावलांवर शफालीने पाऊल ठेवले आहे. हरमनप्रीत २०१६मध्ये महिला बिग बॅशचा करार करणारी पहिली भारतीय ठरली. हरमनप्रीतने सिडनी थंडरचे प्रतिनिधित्व केले.

 

यानंतर स्मृती मंधाना (ब्रिस्बेन हीट) आणि वेदा कृष्णमूर्ती (होबार्ट हरिकेन्स) देखील या लीगमध्ये खेळले. डावखुरी फिरकीपटू राधा यादव या लीगमध्ये खेळणार असल्याचे वृत्त आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian batting sensation shafali verma will play in womens big bash league 2021 adn

ताज्या बातम्या