भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एका अपघातग्रस्त तरुणाला वाचवलं आहे. संबंधित तरुणाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याची कार थेट डोंगराळ रस्त्यावरून खाली कोसळली. यावेळी मोहम्मद शमी आपल्या कारने पाठीमागून येत होता. हा अपघात पाहिल्यानंतर मोहम्मद शमीने तातडीने आपली कार थांबवली आणि अपघातग्रस्त तरुणाला मदत केली. याबाबतचा एक व्हिडीओही शमीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या घटनेनंतर मोहम्मद शमीचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केलं जात आहे. हा अपघात नैनिताल येथे घडला आहे. शमीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.ज्यामध्ये तो अपघातग्रस्त तरुणाला मदत करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by ???????? ????? (@mdshami.11)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहम्मद शमीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “तो खूप भाग्यवान आहे, देवाने त्याला दुसरं जीवन दिलं आहे. नैनितालजवळच्या डोंगराळ रस्त्यावरून आम्ही जात असताना आमच्या समोरच त्याची कार खाली पडली. आम्ही त्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं.” याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.