अजिंक्य रहाणेच्या घरी चिमुकल्याचे आगमन, दसऱ्याच्या शुभदिनी चाहत्यांना दिली गोड बातमी | indian cricketer ajinkya rahane and wife radhika blessed with a boy baby nrp 97 | Loksatta

अजिंक्य रहाणेच्या घरी चिमुकल्याचे आगमन, दसऱ्याच्या शुभदिनी चाहत्यांना दिली गोड बातमी

अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर हे दोघेही २६ सप्टेंबर २०१४ रोजी विवाहबंधनात अडकले होते.

अजिंक्य रहाणेच्या घरी चिमुकल्याचे आगमन, दसऱ्याच्या शुभदिनी चाहत्यांना दिली गोड बातमी

भारतीय फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या घरी दुसऱ्या बाळाचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी राधिका धोपावकरने काही तासांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अजिंक्य रहाणे स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. यानंतर रहाणे कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अजिंक्य रहाणेने इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणाला, “आज (बुधवारी ५ ऑक्टोबर) सकाळी राधिका आणि मी आमच्या बाळाचं जगात स्वागत केलं. राधिका आणि बाळ दोघंही सुखरुप आहेत. तुमच्याकडून मिळालेलं प्रेम आणि आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद!”

अजिंक्य रहाणेच्या या पोस्टवर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. “तुझे खूप खूप अभिनंदन. आपल्या संघाची सर्वात लहान आकाराची जर्सी तयार करण्यास सांगितले आहे. ज्याच्या मागे रहाणे असे लिहिलेले असेल.” तर क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारानेही यावर कमेंट केली आहे. “तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि छोट्यासाठी प्रेम आणि आशीर्वाद,” असे चेतेश्वर पुजारा म्हणाला.

अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर हे दोघेही २६ सप्टेंबर २०१४ रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यांनी मराठी रितीरिवाजानुसार लग्न केलं. लग्नानंतर ५ वर्षांनी २०१९ मध्ये राधिकानं मुलगी आर्याला जन्म दिला होता. आर्याचा जन्म ५ ऑक्टोबर २०१९ रोजी झाला होता. त्यानंतर आता त्याच्या दुसऱ्या मुलाचा जन्मही ५ ऑक्टोबर रोजी झाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शेष भारताची इराणी चषकावर मोहोर ; सौराष्ट्रवर आठ गडी राखून मात

संबंधित बातम्या

ENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ
“तू खरोखरच…”; घरच्याच लोकांनी विरोधकाचा प्रचार करुनही BJP च्या तिकीटावर पत्नीने विजय मिळवल्यानंतर रविंद्र जडेजाची खास पोस्ट
Team India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य
Fifa World Cup Match: ऐकावे ते नवलच…! चक्क ऑपरेशन सुरु असताना चाहता पाहत राहिला सामना, अन्…
विश्लेषण: पोर्तुगाल संघातून ख्रिस्तियानो रोनाल्डोला का वगळले? रोनाल्डोच्या कारकीर्दीची ही अखेर समजावी का?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
पुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा
FIFA WC 2022: ‘कबूतर नृत्य’! लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल
गाय नव्हे माय! निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video
मुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक