Indian Hockey Player Varun Kumar Rape Case : भारतीय हॉकीपटू वरुण कुमारवर एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. वरुणवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. वरुण ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य राहिला आहे. पीडित महिला सध्या विमान कंपनीत कर्मचारी म्हणून काम करते.

महिलेने एफआयआरमध्ये दावा केला आहे की, ती १७ वर्षांची असताना २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार विजेते वरुण कुमारच्या संपर्कात आली होती. यावेळी वरुण बंगळुरू येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षण घेत होता. एफआयआरमध्ये महिलेने आरोप केला आहे की वरुण कुमारने तिच्याशी इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधला आणि भेटण्याचा आग्रह धरला. तो तिला भेटायला येण्यासाठी मेसेज करत राहिला पण जेव्हा तिने प्रतिसाद दिला नाही, तेव्हा त्याने त्याच्या मित्रांना भेटायला मनवण्यास सांगितले. जेव्हा ती त्याला भेटली, तेव्हा त्याने तिच्यासाठी आपली आवड व्यक्त केली, नंतर ते मित्र झाले आणि नातेसंबंधात आले.

Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द

लग्नाच्या बहाण्याने अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले –

त्यानंतर जुलै २०१९ मध्ये वरुणने भविष्याबद्दल बोलण्याच्या बहाण्याने तिला जयनगर, बंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये बोलावले आणि त्यावेळी ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा पीडितेने विरोध केला, तेव्हा त्याने त्यांचे नाते आणखी एक पाऊल पुढे नेण्याचे आणि नंतर तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. एफआयआरमध्ये महिलेने म्हटले आहे की, लग्नाच्या बहाण्याने वरुणने पाच वर्षांच्या नात्यात तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. नंतर वरुणने पीडितेपासून दूर राहण्यास सुरुवात केली आणि तिच्या कॉल आणि मेसेजला प्रतिसाद देणे बंद केले.

हेही वाचा – AUSW vs SAW : आऊट की नॉट आऊट? आंतरराष्ट्रीय सामन्यात महिला अंपायरचा उडाला गोंधळ, VIDEO व्हायरल

फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची दिली धमकी –

यानंतर वरुणने पीडितेला धमकीही दिली की, जर तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला, तर तो तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करेल. एफआयआरनुसार, पीडितेने वरुणवर फसवणुकीचा आरोपही केला आहे. या प्रकरणी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले महिलेच्या तक्रारीच्या आधारे आम्ही सोमवारी हॉकीपटूविरुद्ध पॉक्सो कायदा आणि संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – SAT20 : डर्बन सुपर जायंट्सविरुद्ध एडन मार्करमने घेतला अफलातून झेल, पाहा VIDEO

वरुण २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक संघाचा सदस्य –

मूळचा हिमाचल प्रदेशचा असलेल्या कुमारने २०१७ मध्ये भारतासाठी पदार्पण केले. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले, तेव्हा हिमाचल प्रदेश सरकारने वरुणसाठी १ कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. २०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो एक सदस्य होता.