Indian Hockey team goalkeeper PR Sreejesh on Retirement : भारतीय पुरुष हॉकी संघाची भिंत म्हणून ओळखला जाणारा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश याने पॅरिस ऑलिम्पिक ही त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल आणि त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेणार असल्याचे आधीच सांगितले होते. भारताने गुरुवारी स्पेनचा २-१ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले आणि यासह श्रीजेशने हॉकीला अलविदा केला. श्रीजेश दीर्घ काळापासून भारतीय हॉकी संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. आता त्यांनी याबाबत मौन सोडले आहे.

श्रीजेश हा भारतीय संघातील अशा खेळाडूंपैकी एक आहे, जो टोकियो ऑलिम्पिकच्या कांस्यपदक संघाचाही भाग होता. श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही चमकदार कामगिरी केली आणि प्रतिस्पर्धी संघासमोर भिंतीसारखा उभा राहिला. स्पेनविरुद्धच्या कांस्यपदकाच्या लढतीतही श्रीजेशने अखेरच्या क्वार्टरमध्ये शानदार बचाव करत त्यांना आघाडी घेण्यापासून रोखले. अशा प्रकारे संघाने श्रीजेशला विजयासह निरोप दिला.

श्रीजेश निवृत्तीचा निर्णय बदलणार नाही –

भारताच्या महान गोलरक्षकांपैकी एक असलेल्या पीआर श्रीजेशने सलग दुसरे ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय बदलण्याची शक्यता नाकारली आहे. कारण निरोप घेण्याची हीच योग्य वेळ आहे. पीआर श्रीजेश म्हणाला, “मला वाटते की ऑलिम्पिकमधील पदकासह हॉकीमधून निरोप घेण्याची ही योग्य वेळ आहे. आम्ही रिकाम्या हाताने घरी जात नाही, ही मोठी गोष्ट आहे.”

हेही वाचा – Indian Hockey Team : भारतीय हॉकी संघावर पैशांचा पाऊस, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचे बक्षीस जाहीर

पीआर श्रीजेश पुढे म्हणाला, “मी लोकांच्या भावनांचा आदर करतो पण काही निर्णय अवघड असतात. योग्य वेळी निर्णय घेतल्याने परिस्थिती सुंदर बनते. त्यामुळे माझा निर्णय बदलणार नाही. संघाने चमकदार कामगिरी करत हा सामना अविस्मरणीय बनवला आहे. टोकियोमध्ये जिंकलेल्या पदकाचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये आम्ही पदक जिंकू शकतो हा आत्मविश्वास मिळाला.”

हेही वाचा – India vs Spain Hockey : भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकत ५२ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची केली पुनरावृत्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने स्पेनला चारली पराभवाची धूळ –

या कांस्यपदकाच्या लढतीत भारत आणि स्पेन यांच्यात पहिल्या क्वार्टरमध्ये बरोबरी झाली होती, मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनने एक गोल नोंदवत आघाडी घेतली होती, मात्र अल्पावधीतच भारताचा कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे अचूक गोलमध्ये रुपांतर करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतरही भारतीय संघाच्या खेळाडूंनी स्पेनवरील दडपण कायम ठेवत दुसरा गोल करत २-१ अशी आघाडी घेतली. या आघाडीनंतर भारताने स्पेनला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही आणि जोपर्यंत हूटर वाजला तोपर्यंत भारताने २-१ अशी आघाडी घेत सामना जिंकला. अशा प्रकारे टीम इंडियाने ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे कांस्यपदक जिंकून मोठा पराक्रम केला आहे.