क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर अ‍ॅड हॉक कुस्ती समिती (तात्पुरती समिती) गठित करण्यात आली आहे. वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी निलंबित केल्यानंतर काहीच दिवसांत भारतीय ऑलिम्पिक संघाने भारतीय कुस्ती महासंघाचं कामकाज पाहण्यासाठी तात्पुरती समिती गठित केली आहे. भूपेंद्र बाजवा हे या समितीचे अध्यक्ष असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑलिम्पिक असोसिएशनच्या प्रमुख पीटी उषा म्हणाल्या, कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष (संजय सिंह) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वैयक्तीक कारणांमुळे रेसलिंग फेडरेशनच्या घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन केलं आहे. तसेच ऑलिम्पिक असोसिएशनच्या तत्त्वांच्या विरोधात स्वतःची मनमानी करत काही निर्णय घेतले होते. ऑलिम्पिक असोसिएशनने हे सर्व निर्णय रद्द केले आहेत.

संजय सिंह यांनी कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन केलं होतं. परंतु, स्पर्धा आयोजित करताना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारणी क्रीडा मंत्रालयाने बरखास्त केली. संजय सिंह यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यकारिणी समितीची बैठक बोलावली होती. तसेच राष्ट्रीय स्पर्धा तातडीने आयोजित केली आणि ही स्पर्धा आयोजित करत असताना नियमांचं पालन केलं नसल्याचा ठपका ठेवत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त केली. त्याचबरोबर, बृजभूषण शरण सिंह यांच्या मतदारसंघातील नंदिनी नगर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने ही कारवाई केली होती.

हे ही वाचा >> अन्वयार्थ : कुस्तीतले बाहुबली आजही मोकाट..

दरम्यान, आता ऑलिम्पिक असोसिएशनने कुस्ती महासंघाचा कारभार पाहण्यासाठी तातुपरती तीन सदस्यीय समिती नेमली आहे. भूपेंद्र सिंह बाजवा हे या समितीचे प्रमुख आहेत. त्यांच्याबरोबर एमएम सोमाया आणि मंजूषा कंवर हे या समितीतले सदस्य आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian olympic association forms ad hoc committee to supervise wfi operations asc
First published on: 27-12-2023 at 18:10 IST