पुण्याच्या अनन्या पाणिग्रहीचा समावेश
इस्रायलमध्ये होणाऱ्या १८ वर्षांखालील गटाच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी भारताच्या २४ खेळाडूंची निवड येथे करण्यात आली. त्यामध्ये पुण्याच्या अनन्या पाणिग्रही हिचा समावेश आहे. ही स्पर्धा ७ ते १२ एप्रिल या कालावधीत होणार आहे.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे भारताच्या मुले व मुली गटाकरिता प्रत्येकी दोन संघांची निवड करण्यात आली आहे. भारत ‘अ’ संघात निवड करण्यात आलेल्या खेळाडूंचा खर्च शासनातर्फे केला जाणार आहे तर ‘ब’ संघात निवडलेले खेळाडू स्वखर्चाने या स्पर्धेत सहभागी होतील. निवड समितीत अखिल भारतीय शालेय क्रीडा महासंघ, महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय, पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटना, भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. जे खेळाडू निवड चाचणीत सहभागी झाले नाहीत, त्यांचा निवडीबाबत विचार करण्यात आला नाही असे निवड समितीकडून सांगण्यात आले. भारतीय संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून दिनकर सावंत व बालाजी केंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुली ‘अ’ संघ-मोनिक गांधी, ऋजुता भट, अनन्या पाणिग्रही, आकांक्षा व्होरा, एम.डी.शेर्लीन, दीक्षा रमेश. ‘ब’ संघ-एच.तुलसी, एम.सिमरन, अंतरा अगरवाल, अंजली नायर, अर्चित भारद्वाज, श्रीशा मेहता.
मुले ‘अ’ संघ-नील कॉन्ट्रॅक्टर, एस.पी.निकित, रोहित इमोलिया, रक्षित शेट्टी, अरविंद मणी, मितेश कुंटे. ‘ब’ संघ-टी.सेतुमणी, राहुल शर्मा, महंमद याकुब, राहुल रजानी, बॉबी राणा, के.मुकुंदन.

सोनेरी यश मिळविन : अनन्या
ही स्पर्धा मला आगामी अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी पूर्वतयारी असून या स्पर्धेत मी सोनेरी यश मिळविन असा आत्मविश्वास अनन्या पाणिग्रही हिने व्यक्त केला. भारतीय संघात निवड झालेली ती पुण्याची एकमेव खेळाडू आहे. ती पुढे म्हणाली, ५० व १०० मीटर बॅकस्ट्रोक या शर्यतींमध्ये मी भाग घेत आहे. या शर्यतीमध्ये मी राष्ट्रीय विक्रम केला असल्यामुळे पदक मिळविण्यात मला अडचण येणार नाही. येथील सराव शिबिरात आमच्याकडून भरपूर सराव करुन घेण्यात येत आहे.
अनन्या हिने नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच गतवर्षी ऑलिम्पिकपूर्व पात्रता स्पर्धेतही भाग घेण्याची संधी तिला मिळाली होती. तिने इंडो-बांगला क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई केली होती. त्याखेरीज अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये तिने पदकांची लयलूट केली आहे. ती सध्या एनसीएल ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी शास्त्र शाखेत शिकत आहे.

all the three parties in grand alliance fighting to take the lok sabha seat of nashik
भुजबळांचे विधान अन नाशिकमध्ये उमेदवारांच्या स्पर्धेत वाढ
NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात