हीरो चषक जागतिक हॉकी लीग दुसऱ्या फेरीच्या सामन्यांसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व रितू राणी हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर १८ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
पतियाळा येथे झालेल्या निवड चाचणीमधून बलबिरसिंग, सुरिंदर कौर, हरविंदरसिंग व मुख्य प्रशिक्षक नील हॉवगुड यांच्या समितीने भारताच्या १८ खेळाडूंची निवड करण्यात आली. चंचन देवी हिच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. भारतास या स्पर्धेत मलेशिया (१९ फेब्रुवारी), फिजी (२१ फेब्रुवारी), जपान (२२ फेब्रुवारी) व रशिया (२४ फेब्रुवारी) या संघांबरोबर खेळावे लागणार आहे. भारतीय संघ : गोलरक्षक-योगिता बाली, सविताकुमारी. बचाव फळी-दीप ग्रेस एक्का, जसप्रित कौर, जॉयदीप कौर, किरणदीप कौर. मध्यरक्षक-रितू राणी (कर्णधार), चंचन देवी (उपकर्णधार), नमिता टोपो, वंदना कटारिया, सुशीला चानू, लिली चानू, आघाडी फळी-पूनम राणी, सौंदर्या येंदळा, अनुपा बार्ला, राणी कुमारी, नवज्योत कौर, लिलिमा मिन्झ.