अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) आणि आयएमजी-रिलायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या फुटबॉल लीगचे वेळापत्रक ठरवण्याबाबत मंगळवारी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली नसून ही बैठक या आठवडय़ातच होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेबाबतचा आराखडा आयएमजी-रिलायन्सने अद्याप उघड केला नाही तसेच आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील क्लब्सनी आपल्या खेळाडूंना या स्पर्धेसाठी खेळण्याची परवानगी नाकारल्यामुळे ही बैठक लांबणीवर टाकल्याचे एआयएफएफने सांगितले.