Women’s Cricket World Cup IND vs SL: भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करत महिला एकदिवसीय विश्वचषकाला विजयाने सुरूवात केली आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ ला आजपासून म्हणजेच ३० सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. यजमान भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्ध सामन्याने मोहिमेला सुरूवात केली. टीम इंडियाने सांघिक कामगिरीच्या जोरावर या सामन्यात विजय मिळवला आहे.

भारताने श्रीलंकेला २११ धावांवर सर्वबाद करत ५९ धावांनी डीएलएसप्रमाणे विजय मिळवला. भारताच्या डावात ३ वेळा पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबला आणि त्यामुळे सामना हा ४७ षटकांचा करण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ ९ चेंडू शिल्लक ठेवत २११ धावांवर सर्वबाद झाला.

भारताने दिलेल्या २७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने सावध सुरूवात केली. पण भारताच्या गोलंदाजीसमोर फार काळ टिकू शकले नाही. हसीनी परेराला क्रांती गौडने बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर दीप्ती शर्माने चमारी अट्टापट्टूला ४३ धावांवर बाद करत सर्वात मोठी विकेट मिळवली. यानंतर ठराविक अंतराने श्रीलंकेने विकेट्स गमावल्या.

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. श्रीलंकेकडून ४० वर्षीय प्रबोधनीने २ विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू रानावीरा हिने एका षटकात ३ विकेट्स घेतल्या आणि संपूर्ण सामन्यात ४ विकेट्स घेतल्या. तर कुलासूर्या व चमारी यांनी १-१ विकेट्स घेतल्या.

१२६-६ तत्त्पूर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताची सुरूवात फारशी चांगली नाही कारण, स्मृती मानधना अवघ्या ८ धावा करत बाद झाली. यानंतर प्रतिका रावल व हरलीन देओल यांनी संघाचा डाव सावरला. प्रतिका रावल ३७ धावा तर हरलीन देओल ४८ धावांची खेळी केली. तर हरमन झटपट २१ धावा करत बाद झाली. यानंतर दीप्ती शर्मा व अमनजोत कौर यांनी शतकी भाहीदारी केली आणि संघाचा डाव सावरला.

अमनजोत कौरला श्रीलंकेकडून तीन वेळा जीवदान मिळालं, ज्याचा तिने चांगला फायदा करून घेतला आणि अर्धशतकी खेळी केली. अमनजोतने ५६ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावांची खेळी केली. तर दीप्ती शर्माने ५३ चेंडूत ४ चौकारांसह ५३ धावा केल्या. याशिवाय अखेरच्या २ षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या स्नेह राणाने उत्कृष्ट फटकेबाजी करत १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावांची खेळी केली. यासह भारताने २६९ धावा केल्या.

भारताकडून दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेतल्या. दीप्तीने अर्धशतक आणि नंतर गोलंदाजीत ३ विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरीसह सामनावीराच पुरस्कार पटकावला. याशिवाय श्रीचरणी व स्नेह राणाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर क्रांती गौड, अमनजोत व प्रतिका रावल यांनी १-१ विकेट्स घेतल्या.