भारतीय महिला संघ विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात शुक्रवारी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना झाला. अँटिग्वाच्या सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजने एका धावेने विजय मिळवला. सामना अत्यंत अटीतटीचा झाला, पण सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. असे असले तरी पराभवानंतरही सर्वत्र चर्चा मात्र भारताच्या हरमनप्रीत कौरचीच असल्याचे दिसून आले.
हरमनप्रीतने सामन्यादरम्यान एक अफलातून कॅच टिपला. वेस्ट इंडिज संघाच्या स्टॅफनी टेलरचा झेल हरमनप्रीतने डावाच्या शेवटच्या चेंडूवर एका हाताने टिपला. स्टॅफनी शतकासाठी षटकाराच्या शोधात होती. पण हरमनप्रीतने तिचा ‘सुपरकॅच’ पकडल्यामुळे टेलर ९४ धावांवर बाद झाली. हरमनप्रीतने अत्यंत चपळाईने सीमारेषेजवळ झेल घेतला. तिने झेल घेतल्यावर ती सीमारेषेच्या अगदी जवळ पडली, पण तिने चेंडू हातून सुटू दिला नाही आणि फलंदाजाला बाद केले.
The Flying Kaur! Stunner by harmanpreet kaur pic.twitter.com/14MTXBlwTC
— nikunj shah (@niku1630) November 3, 2019
सध्याच्या हा व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे. भारताच्या महिलांचा संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे.
