संघाच्या सरावाच्या वेळी फुटबॉल खेळताना झालेल्या दुखापतीमुळे भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगला बुधवारी सरावाला मुकावे लागले. मंगळवारी फुटबॉल खेळत असताना युवराजच्या डाव्या पायाच्या घोटय़ाला दुखापत झाली होती. ‘‘युवराजच्या डाव्या पायाच्या घोटय़ाला दुखापत झाली असल्याने काळजी घेण्यासाठी त्याला बुधवारी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे,’’ असे संघाचे प्रसारमाध्यम व्यवस्थापक डॉ. आर. एन. बाबा यांनी सांगितले. २००६ साली चॅम्पियन्स करंडकामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान खो-खो खेळताना युवराजच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्याला बरेच महिने क्रिकेटपासून वंचित राहावे लागले होते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2014 रोजी प्रकाशित
जायबंदी युवराज सरावाला गैरहजर
संघाच्या सरावाच्या वेळी फुटबॉल खेळताना झालेल्या दुखापतीमुळे भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगला बुधवारी सरावाला मुकावे लागले
First published on: 03-04-2014 at 05:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Injury scare for yuvraj singh ahead of wt20 semi final