पीटीआय, नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने कॅलिथिआ (ग्रीस) येथे झालेल्या १२व्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ८.३१ मीटर विक्रमी अंतरासह सुवर्णपदकाची कमाई केली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या श्रीशंकरने गेल्या महिन्यात ८.३६ मीटरचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. तो या वेळी मोडीत काढला. या स्पर्धेत स्वीडनच्या थोबियास माँटलरने (८.२७ मीटर) रौप्यपदक आणि फ्रान्सच्या ज्युलीस पॉमेरीने (८.१७ मीटर) कांस्यपदकाची कमाई केली. १० खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत फक्त तीन स्पर्धकांना आठ मीटरचे अंतर ओलांडता आले. जेसविन एल्डरिनला (७.६९ मीटर) पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

ऑलिम्पिकनंतर पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या श्रीशंकरने बुधवारी सायंकाळी सरावाप्रसंगी ७.८८ मीटर आणि ७.७१ मीटर अंतराच्या उडय़ा घेतल्या होत्या. परंतु देशांतर्गत स्पर्धामध्ये श्रीशंकरने सातत्याने आठ मीटरचे अंतर अनेकदा ओलांडले होते. केरळच्या श्रीशंकरने तिरुवनंतपूरम येथे हंगामाचा प्रारंभ करणाऱ्या

इंडियन खुल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत

८.१४ मीटर आणि ८.१७ मीटर असे अंतर गाठले होते. त्यानंतर कोळीकोडे येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत तमिळनाडूच्या जेसविन एल्ड्रिनवर निसटती मात करीत नवा राष्ट्रीय विक्रम निर्माण केला होता.