चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय व पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्ट यांच्यातर्फे ५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये अनेक ज्येष्ठ खेळाडू व संघटक सहभागी होणार आहेत.
महाविद्यालयाच्या प्राचार्या नयना निमकर व संयोजन समितीचे अध्यक्ष धनंजय दामले यांनी ही माहिती दिली. हे चर्चासत्र यशवंतराव चव्हाण अकादमी (यशदा) येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. त्यामध्ये केनिया, इथिओपिया, जपान, नेदरलँड्स, स्वीडन, टांझानिया, मॉरिशस व भारत आदी देशांमधील दोनशे जण सहभागी होत
आहेत.
केनिया व इथिओपियाच्या धावपटूंचे प्रशिक्षक पॉल मुटावाई, येथील क्रीडा वैद्यक तज्ज्ञ डॉ. पराग संचेती, अॅथलेटिक्स संघटक प्रल्हाद सावंत यांचा समावेश आहे.
मॅरेथॉन शर्यतीत यश कसे मिळवायचे, धावपटूंनी शारीरिक क्षमता कशी ठेवावी, शर्यतीत कसे धावायचे आदी विषयावर या चर्चासत्रात सविस्तर चर्चा होणार आहे. या चर्चासत्रासंबंधी चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय, गुलटेकडी येथे सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2014 रोजी प्रकाशित
मॅरेथॉन शर्यतीबाबत ५ डिसेंबरला पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्र
चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय व पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्ट यांच्यातर्फे ५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
First published on: 25-11-2014 at 01:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International level seminar on 5 december about pune international marathon