IPL 2018 Retetion : चेन्नईच्या संघात धोनीची वापसी; केकेआरमधून गंभीर बाहेर

सर्व संघांनी जाहीर केली यादी

संग्रहित छायाचित्र

सर्व आपीएल संघांनी २०१८च्या नव्या सीझनसाठी निवडलेल्या आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खेळाडूंची ही यादी जाहीर करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. आता यानंतर २७ आणि २८ जानेवारी रोजी आयपीएलची बोली लागणार आहे. यंदा ४ ते २७ एप्रिलदरम्यान आयपीएल स्पर्धा होणार आहे.

आयपीएलच्या ११व्या सीजनसाठी संघाने कायम न ठेवलेल्या खेळांडूंमध्ये गौतम गंभीरचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची चेन्नईच्या संघात वापसी झाली आहे. स्टीव स्मिथला राजस्थान रॉयल्सच्या संघाने घेतले आहे. तर रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि बुमराह यांना मुंबई इंडियन्सच्या संघाने कायम ठेवले आहे.

चेन्नई, बंगळूरु, दिल्ली आणि मुंबईच्या संघांनी तीन-तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर हैदराबाद आणि कोलकाताच्या संघाने प्रत्येकी दोन खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तसेच पंजाब आणि राजस्थानच्या संघाने प्रत्येकी एका खेळाडूला आपापल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आठही संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी :

१. रॉयल चैलेंजर्स बेंगलुरू : विराट कोहली, ए. बी. डिविलियर्स, सरफराज खान
२. चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा
३. मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या
४. दिल्ली डेयरडेविल्स : क्रिस मॉरिस, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर
५. कोलकाता नाइटराइडर्स : सुनील नरेन, आंद्रे रसेल
६. सनराइजर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार
७. राजस्थान रॉयल्स : स्टीव स्मिथ
८. किंग्स इलेवन पंजाब : अक्षर पटेल

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2018 retention dhonis return to chennai gambhir out of kkr

ताज्या बातम्या