आयपीएलच्या बाराव्या हंगामात बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी अवघ्या एका विजयाची आवश्यकता असलेल्या मुंबई इंडियन्ससमोर आणखी एक अडचण उभी ठाकली आहे. संघाचा ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ मायदेशी परतणार आहे. विश्वचषकासाठीच्या राष्ट्रीय शिबीरात सहभागी होण्यासाठी बेहरनडॉर्फ माघारी परततो आहे. त्याने आपल्या ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे.

बाराव्या हंगामात बेहरनडॉर्फने मुंबईकडून ५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर ५ बळी जमा आहेत. मात्र यासाठी त्याने १६५ धावाही मोजल्या आहेत. कोलकात्याकडून ईडन गार्डन्स मैदानावर पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मुंबईचा पुढचा सामना २ मे रोजी वानखेडे मैदानावर सनराईजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – IPL 2019 : मुंबईने सामना गमावला, कर्णधार रोहितला दंड