IPL 2019 KXIP vs SRH Live – अखेरच्या षटकात निर्णायक चौकार मारून लोकेश राहुलने पंजाबला हैदराबादवर ६ गडी राखून विजय मिळवून दिला. डेव्हिड वॉर्नरची अर्धशतकी खेळी आणि शेवटच्या षटकातील दिपक हुडाची फटकेबाजी याच्या जोरावर हैदराबादने २० षटकात ४ बाद १५० धावा केल्या आणि पंजाबपुढे विजयासाठी १५१ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना राहुलने धमाकेदार ७१ धावांची नाबाद खेळी केली. त्याला मयंक अग्रवालने (५५) चांगली साथ दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाबच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. फटकेबाज सुरुवात केलेला ख्रिस गेल लवकर बाद झाला. त्याने १४ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार लगावत १६ धावा केल्या. पण आणखी एक उत्तुंग षटकार लगावण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. गेल बाद झाल्यावर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे पंजाबला सामन्यात भक्कम स्थिती प्राप्त झाली. सतत फलंदाजीवर टीका होणाऱ्या राहुलने सामन्यात अर्धशतक झळकावले. याबरोबरच पंजाबनेही शतकी मजल मारली. राहुल पाठोपाठ मयंक अग्रवालनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आपली उपयुक्तता सिद्ध केली. अर्धशतक झाल्यानंतर मयंक लगेच बाद झाला. त्याने ४३ चेंडूत ५५ धावा केल्या. अनुभवी डेव्हिड मिलर उंच फटका मारून झेलबाद झाला आणि सामन्यात रंगत वाढली. मिलरने केवळ १ धाव केली. पाठोपाठ मनदीप सिंगदेखील मोठा फटका खेळताना झेल बाद झाला आणि सामन्यात रंगतदार ‘ट्विस्ट’ आला. अखेर शेवटच्या षटकात योग्य वेळी चौकार लगावत आणि त्यानंतर चपळाईने दुहेरी धाव घेत राहुलने पंजाबला विजय मिळवून दिला.

त्याआधी हैदराबादच्या डावाच्या सुरुवातीला फिरकीपटू मुजीब ऊर रहमान याच्या गोलंदाजीच्या जाळ्यात तडाखेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टो अचूक अडकला. बेअरस्टोला ६ चेंडूत केवळ १ धाव जमवता आली आणि हैदराबादला पहिला धक्का बसला. कर्णधार अश्विनने त्याचा झेल टिपला. बेअरस्टोला स्वस्तात बाद केल्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे अतिशय संथ सुरुवात करणाऱ्या हैदराबादचे ११ व्या षटकात अर्धशतक झाले. अतिशय सावध खेळ करणारा विजय शंकर अखेर बाद झाला. चेंडूला बॅटने हलकेच दिशा देण्याच्या प्रयत्नात त्याचा यष्टिरक्षकाने झेल टिपला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. विजयने २७ चेंडूत २ चौकारांसह २६ धावा केल्या. डावाला संथ सुरुवात झाल्यामुळे हैदराबादने मोहम्मद नबीला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती दिली. पण त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्याने ७ चेंडूत १२ धावा केल्या. दुसरीकडे अतिशय शांत आणि संयमी खेळी करत डेव्हिड वॉर्नरने एक बाजू लावून धरली आणि ४९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मनीष पांडेने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण तो २ चौकार लागवण्यातच यशस्वी झाला. त्याने १५ चेंडूत १९ धावा केल्या. वॉर्नरने डावाच्या अखेरपर्यंत झुंज देत ६२ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ७० धावा केल्या. तर शेवटचे तीन चेंडू वाट्याला आलेला दीपक हुडा याने २ चौकार आणि १ षटकार लगावत नाबाद १४ धावा केल्या.

Live Blog

Highlights

  • 22:58 (IST)

    राहुलचे अर्धशतक; पंजाबची शतकी मजल

    ??? ????????? ???? ???????? ??????? ???????? ??????? ???????. ???????? ????????? ???? ??? ?????.

  • 20:19 (IST)

    नाणेफेक जिंकून पंजाबची प्रथम गोलंदाजी

    ????? ?????? ?????? ???????? ???????? ????? ????? ?????. ???????? ?????? ???????? ??????? ???????? ????? ??? ????. ???????? ??????? ?????? ??????? ????? ?????????? ?????? ?????.

23:33 (IST)08 Apr 2019
मनदीप झेलबाद; सामन्यात रंगतदार 'ट्विस्ट'

पाठोपाठ मनदीप सिंगदेखील मोठा फटका खेळताना झेल बाद झाला आणि सामन्यात रंगतदार 'ट्विस्ट' आला.

23:26 (IST)08 Apr 2019
डेव्हिड मिलर माघारी; सामन्यात रंगत

अनुभवी डेव्हिड मिलर उंच फटका मारून झेलबाद झाला आणि सामन्यात रंगत वाढली. मिलरने केवळ १ धावा केली.

23:21 (IST)08 Apr 2019
मयंक बाद; पंजाबला दुसरा धक्का

अर्धशतक झाल्यानंतर मयंक लगेच बाद झाला. त्याने ४३ चेंडूत ५५ धावा केल्या.

23:16 (IST)08 Apr 2019
मयंक अग्रवालचे अर्धशतक

राहुल पाठोपाठ मयंक अग्रवालनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आपली उपयुक्तता सिद्ध केली.

22:58 (IST)08 Apr 2019
राहुलचे अर्धशतक; पंजाबची शतकी मजल

सतत फलंदाजीवर टीका होणाऱ्या राहुलने सामन्यात अर्धशतक झळकावले. याबरोबरच पंजाबनेही शतकी मजल मारली.

22:47 (IST)08 Apr 2019
राहुल-मयंकने डाव सावरला; पंजाब भक्कम स्थितीत

गेल बाद झाल्यावर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे पंजाबला सामन्यात भक्कम स्थिती प्राप्त झाली.

22:15 (IST)08 Apr 2019
ख्रिस गेल झेलबाद; पंजाबला पहिला धक्का

फटकेबाज सुरुवात केलेला ख्रिस गेल लवकर बाद झाला. त्याने १४ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार लगावत १६ धावा केल्या. पण आणखी एक उत्तुंग षटकार लगावण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.

21:45 (IST)08 Apr 2019
वॉर्नर-हुडाची फटकेबाजी; पंजाबला १५१ धावांचे आव्हान

डेव्हिड वॉर्नरची अर्धशतकी खेळी आणि शेवटच्या षटकातील दिपक हुडाची फटकेबाजी याच्या जोरावर हैदराबादने २० षटकात ४ बाद १५० धावा केल्या. पंजाबपुढे विजयासाठी १५१ धावांचे आव्हान आहे.

21:39 (IST)08 Apr 2019
मनीष पांडे झेलबाद; हैदराबादला चौथा धक्का

मनीष पांडेने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण तो २ चौकार लागवण्यातच यशस्वी झाला. त्याने १५ चेंडूत १९ धावा केल्या.

21:21 (IST)08 Apr 2019
डेव्हिड वॉर्नरचे संघर्षमय अर्धशतक

अतिशय शांत आणि संयमी खेळी करत डेव्हिड वॉर्नरने एक बाजू लावून धरली आणि ४९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

21:11 (IST)08 Apr 2019
मोहम्मद नबी बाद; हैदराबादला तिसरा धक्का

डावाला संथ सुरुवात झाल्यामुळे हैदराबादने मोहम्मद नबीला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती दिली. पण त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्याने ७ चेंडूत १२ धावा केल्या.

20:53 (IST)08 Apr 2019
विजय शंकर बाद; हैदराबादला दुसरा धक्का

अतिशय सावध खेळ करणारा विजय शंकर अखेर बाद झाला. चेंडूला बॅटने हलकेच दिशा देण्याच्या प्रयत्नात त्याचा यष्टिरक्षकाने झेल टिपला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. विजयने २७ चेंडूत २ चौकारांसह २६ धावा केल्या.

20:52 (IST)08 Apr 2019
हैदराबादची संथ सुरुवात; ११ व्या षटकात अर्धशतक

बेअरस्टोला स्वस्तात बाद केल्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे अतिशय संथ सुरुवात करणाऱ्या हैदराबादचे ११ व्या षटकात अर्धशतक झाले.

20:21 (IST)08 Apr 2019
धोकादायक बेअरस्टो माघारी; हैदराबादला पहिला धक्का

फिरकीपटू मुजीब ऊर रहमान याच्या गोलंदाजीच्या जाळ्यात तडाखेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टो अचूक अडकला. बेअरस्टोला ६ चेंडूत केवळ १ धाव जमवता आली आणि हैदराबादला पहिला धक्का बसला. कर्णधार अश्विनने त्याचा झेल टिपला.

20:19 (IST)08 Apr 2019
नाणेफेक जिंकून पंजाबची प्रथम गोलंदाजी

दोनही संघाना गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेक महत्वाची मानली जात होती. सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 kxip vs srh kings xi punjab vs sunrisers hyderabad live updates at punjab
First published on: 08-04-2019 at 20:17 IST