बटलरच्या झंजावाती खेळीने राजस्थानला सापडला विजयी सूर, मुंबईवर 4 गडी राखून मात

बटलरच्या 43 चेंडूत 89 धावा

सलामीवीर जोस बटलरचं धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर राजस्थान रॉयल्सने, बाराव्या हंगामात आपल्या पराभवाची मालिका अखेर खंडीत केली आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला राजस्थानने 4 गडी राखून पराभूत केलंय. मुंबईने विजयासाठी दिलेलं 188 धावांचं आव्हान राजस्थानने बटलरच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. बटलरने 43 चेंडूत 89 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. मुंबईकडून कृणाल पांड्याने 3, जसप्रीत बुमराहने 2 तर राहुल चहरने 1 बळी घेतला.

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. मुंबईच्या गोलंजांचा नेटाने सामना करत दोन्ही फलंदाजांनी संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेचा अडसर दूर केल्यानंतर बटलरने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरला. बटलरने यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण करत मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. राजस्थानचा संघ विजयाच्या जवळ आलेला असतानाच, सॅमसन, बटलर, राहुल त्रिपाठी, लिव्हींगस्टोन, स्मिथ हे फलंदाज माघारी परतले. यामुळे राजस्थानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं होतं. मात्र तळातल्या फलंदाजांनी राजस्थानचा विजय सुनिश्चीत केला.

त्याआधी, सलामीवीर क्विंटन डी कॉकचे अर्धशतक (८१) आणि रोहित शर्माची (४६) फटकेबाज खेळी याच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १८७ धावा केल्या. नाणेफेक जिंकून राजस्थानने मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबईचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यामुळे ४.२ षटकातच म्हणजे केवळ २६ चेंडूत मुंबईने अर्धशतकी मजल मारली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फटकेबाजी करत होता. मात्र त्याच फटकेबाजीच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. त्याने ३२ चेंडूत ४७ धावा केल्या.

रोहितला अर्धशतकाने हुलकावणी दिली असली, तरी सलामीवीर क्विंटन डी कॉक याने फटकेबाजी सुरु ठेवली आणि अर्धशतक पूर्ण केले. या बरोबरच मुंबईनेही शतकी मजल मारली. चांगल्या लयीत असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव या सामन्यात फारशी छाप पाडू शकला नाही. धवल कुलकर्णीच्या गोइलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. यादवने १६ धावा केल्या. धोकादायक खेळी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला कायरन पोलार्ड स्वस्तात माघारी परतला. त्याने १२ चेंडूत ६ धावा केल्या. सलामीवीर क्विंटन डी कॉकने एक बाजू लावून धरत दमदार ८१ धावांची खेळी केली. पण फटकेबाजी करताना तो झेलबाद झाला. त्याने या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार लगावले. इशान किशन ५ धावांवर माघारी परतला. शेवटच्या टप्प्यात हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत नाबाद २८ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला १८७ धावांपर्यंत मजल मारता आली.

Live Blog

19:40 (IST)13 Apr 2019
तळातल्या फलंदाजांकडून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब

4 गडी राखून राजस्थान विजयी

19:27 (IST)13 Apr 2019
स्टिव्ह स्मिथ माघारी, राजस्थानला सहावा धक्का

जसप्रीत बुमराहने घेतला बळी, अखेरच्या षटकात राजस्थानच्या फलंदाजांची हाराकिरी. मुंबईचं दमदार पुनरागमन

19:25 (IST)13 Apr 2019
राजस्थानचा निम्मा संघ माघारी

कृणाल पांड्याने उडवला लिव्हींगस्टोनचा त्रिफळा

19:23 (IST)13 Apr 2019
राहुल त्रिपाठी माघारी, राजस्थानला चौथा धक्का

कृणाल पांड्याने घेतला बळी

19:21 (IST)13 Apr 2019
राजस्थानला तिसरा धक्का, संजू सॅमसन बाद

विजय दृष्टीपथात आलेला असताना सॅमसन बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत

19:03 (IST)13 Apr 2019
राजस्थानला दुसरा धक्का, जोस बटलर माघारी

राहुल चहरने घेतला बटलरचा बळी

18:53 (IST)13 Apr 2019
जोस बटलरचं अर्धशतक

राजस्थानचा डाव सावरला

18:33 (IST)13 Apr 2019
आश्वासक सुरुवातीनंतर राजस्थान रॉयल्सचा पहिला धक्का, रहाणे माघारी

संजू सॅमसन आणि अजिंक्य रहाणे यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेला माघारी धाडत मुंबईला पहिलं यश मिळवून दिलं आहे.

17:50 (IST)13 Apr 2019
डी कॉकचा धडाका; राजस्थानला १८८ धावांचे आव्हान

सलामीवीर क्विंटन डी कॉकचे अर्धशतक (८१) आणि रोहित शर्माची (४६) फटकेबाज खेळी याच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १८७ धावा केल्या. राजस्थानला विजयासाठी १८८ धावांचे आव्हान आहे.

17:33 (IST)13 Apr 2019
डी कॉक माघारी; मुंबईला चौथा धक्का

सलामीवीर क्विंटन डी कॉकने दमदार ८१ धावांची खेळी केली पण फटकेबाजी करताना तो झेलबाद झाला. त्याने या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार लगावले.

17:22 (IST)13 Apr 2019
पोलार्ड स्वस्तात माघारी; मुंबईला तिसरा धक्का

धोकादायक खेळी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला कायरन पोलार्ड स्वस्तात माघारी परतला. त्याने १२ चेंडूत ६ धावा केल्या.

17:02 (IST)13 Apr 2019
सूर्यकुमार यादव त्रिफळाचीत; मुंबईला दुसरा धक्का

चांगल्या लयीत असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव या सामन्यात फारशी छाप पाडू शकला नाही. धवल कुलकर्णीच्या गोइलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. यादवने १६ धावा केल्या.

16:56 (IST)13 Apr 2019
डी कॉकचे अर्धशतक, मुंबईची शतकी मजल

रोहितला अर्धशतकाने हुलकावणी दिली असली, तरी सलामीवीर क्विंटन डी कॉक याने फटकेबाजी सुरु ठेवली आणि अर्धशतक पूर्ण केले. या बरोबरच मुंबईनेही शतकी मजल मारली.

16:47 (IST)13 Apr 2019
रोहित शर्मा झेलबाद; मुंबईला पहिला धक्का

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फटकेबाजी करत होता. मात्र त्याच फटकेबाजीच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. त्याने ३२ चेंडूत ४७ धावा केल्या.

16:23 (IST)13 Apr 2019
मुंबईची धडाकेबाज सुरुवात, पाचव्या षटकात अर्धशतक

मुंबईचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यामुळे ४.२ षटकातच म्हणजे केवळ २६ चेंडूत मुंबईने अर्धशतकी मजल मारली.

15:35 (IST)13 Apr 2019
नाणेफेक जिंकून राजस्थानची प्रथम गोलंदाजी

वानखेडे मैदानावर नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गेल्या सामन्याला मुकलेला रोहित शर्मा मुंबईच्या कर्णधारपदी परतला आहे. त्या जागी सिद्धेश लाड याला संघाबाहेर व्हावे लागले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2019 mi vs rr mumbai indians rajasthan royals t20 cricket match live updates at mumbai