रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा संघ इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या एलिमिनेटर सामन्यात आमनेसामने येतील. आज संध्याकाळी खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात जो संघ हरेल तो स्पर्धेबाहेर असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ पहिल्यांदाच अत्यंत आत्मविश्वासाने खेळत आहे तर कोलकात्याने प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जोरदार पुनरागमन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकाता संघाला या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात व्यंकटेश अय्यरच्या रूपात स्फोटक सलामीवीर मिळाला आहे. आजच्या महत्त्वाच्या सामन्यात तो संघासाठी दमदार खेळी करण्यास उत्सुक असेल. मधल्या फळीत संघ सांभाळण्याची जबाबदारी राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा यांच्यावर असेल. कर्णधार ईऑन मॉर्गनने शेवटच्या सामन्यात काही चांगले फटके खेळले, कार्तिक देखील लयमध्ये असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – IPL 2021 : कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘स्टार’ खेळाडूचा RCBला रामराम! ‘हे’ आहे कारण

रसेलचे कमबॅक?

या सामन्यात स्फोटक अष्टपैलू आंद्रे रसेल परतू शकतो, अशा परिस्थितीत शाकिब अल हसनला वगळले जाऊ शकते. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरिन हे फिरकीपटू आरसीबीसाठी अडचणीचे ठरू शकतात. लॉकी फर्ग्युसन आणि शिवम मावी यांच्या वेगाला सामोरे जाणे देखील विराटच्या फलंदाजांना सोपे जाणार नाही.

कोलकाताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

व्यंकटेश अय्यर, शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, ईऑन मॉर्गन (कप्तान), सुनील नरिन, शाकिब अल हसन किंवा आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 andre russell may comeback in playing eleven of kkr against rcb adn
First published on: 11-10-2021 at 17:05 IST