ऋतुराज गायकवाड, राॉबिन उथप्पा आणि कप्तान महेंद्रसिंह धोनी यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा ४ गडी राखून पाडाव करत आयपीएल २०२१च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुबईच्या मैदानावर प्रेक्षकांना रंगतदार सामना पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकलेल्या धोनीने दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कप्तान ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकी खेळींमुळे दिल्लीने २० षटकात ५ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऋतुराज -रॉबिनने ११० धावांची भागीदारी करत चेन्नईला चांगल्या स्तरावर पोहोचवले, परंतु दिल्लीच्या गोलंदाजांनी उत्तम मारा करत चेन्नईला संकटात टाकले होते. शेवटच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे धोनीने चेन्नईला विजय मिळवून दिला. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या पराभवामुळे आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दिल्लीला अजून एक संधी मिळणार आहे.

चेन्नईचा डाव

दिल्लीचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाने डु प्लेसिलला क्लीन बोल्ड करत चेन्नईला पहिला धक्का दिला. डू प्लेसिसला एक धाव करता आली. तो माघारी परतल्यानंतर रॉबिन उथप्पा मैदानात आला. त्याने पहिल्याच चेंडूवर अप्रतिम फटका खेळत चौकार ठोकला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात चेन्नईने आपले अर्धशतक पूर्ण केले. १०व्या षटकात उथप्पाने अर्धशतक पूर्ण केले. चेन्नईसाठी त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. १४व्या षटकात टॉम करनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात उथप्पा झेलबाद झाला. श्रेयस अय्यरने सीमारेषेवर उथप्पाचा सुंदर झेल टिपला. उथप्पाने ७ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. उथप्पानंतर चेन्नईने शार्दुल ठाकूरला फलंदाजीसाठी बढती दिली. याच षटकात ऋतुराजने अर्धशतक पूर्ण केले. पण चेन्नईला अजून एक फलंदाजाला गमवावे लागले. शार्दुल शून्यावर माघारी परतला. करननेच त्याला तंबूत धाडले. १५व्या षटकात चेन्नईने अंबाती रायुडूलाही स्वस्तात गमावले. चोरटी धाव घेण्याच्या नादात रायुडू धावबाद झाला. चेन्नईला विजयासाठी १२ चेंडूत २४ धावांची गरज असताना आवेश खानने ऋतुराजला बाद केले. ऋतुराजने ५ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. त्याच्यानंतर कप्तान धोनी मैदानात आला. धोनीने ६ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १८ धावा करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीकडून करनने २९ धावांत ३ बळी घेतले.

हेही वाचा – IPL २०२१ दरम्यान ‘दिग्गज’ भारतीय क्रिकेटरला मिळाली डॉक्टरेट पदवी; फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीनं केला सन्मान!

दिल्लीचा डाव

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्लीच्या डावाची सुरुवात केली. दीपक चहरने टाकलेल्या तिसऱ्या षटकात पृथ्वीने चार चौकार ठोकत आपला आक्रमक अंदाज दाखवला. चौथ्या षटकात जोश हेझलवूडने सलामीवीर शिखर धवनला यष्टीपाठी झेलबाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. धवन ७ धावांवर माघारी परतला. धवननंतर आलेला श्रेयस अय्यर अपयशी ठरला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात धोनीने हेझलवूडला गोलंदाजी दिली. त्याने अय्यरला तंबूत पाठवत त्याचा विश्वास सार्थ ठरवला. अय्यरला एक धाव करता आली. नवव्या षटकात पृथ्वीने जडेजाला चौकार खेचत २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ११व्या षटकात रवींद्र जडेजाला मोठा फटका खेळण्याच्या नादात पृथ्वीने डु प्लेसिसच्या हाती सोपा झेल दिला. पृथ्वीने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. त्यानंतर शिमरोन हेटमायर आणि ऋषभ पंत यांनी १४व्या षटकात दिल्लीचे शतक फलकावर लावले. या दोघांनी दिल्लीच्या डावाला आकार दिला. हेटमायर-पंतने १७व्या षटकात अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पंतने २०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. २० षटकात दिल्लीने ५ बाद १७२ धावा केल्या.

Live Updates
23:24 (IST) 10 Oct 2021
चेन्नई फायनलमध्ये

कप्तान महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकात ३ चौकार ठोकत दिल्लीला ४ गडी आणि २ चेंडू राखून मात दिली. मोक्याच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे धोनीने चेन्नईला अंतिम फेरीत पोहोचवले. या विजयासह चेन्नईने ९व्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला.

23:12 (IST) 10 Oct 2021
चेन्नईला अजून एक धक्का

टॉम करनने शेवटच्या षटकात मोईन अलीला झेलबाद केले. चेन्नईला ५ चेंडूत १३ धावांची गरज आहे.

23:11 (IST) 10 Oct 2021
चेन्नई की दिल्ली?

चेन्नईला विजयासाठी ६ चेंडूत १३ धावांची गरज आहे. धोनी आणि मोईन अली मैदानात आहेत.

23:07 (IST) 10 Oct 2021
ऋतुराज बाद

१९व्या षटकात आवेश खानने ऋतुराजला बाद करत चेन्नईला संकटात टाकले. ऋतुराजने ५ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. त्याच्यानंतर कप्तान धोनी मैदानात आला आहे.

23:04 (IST) 10 Oct 2021
सामना रंगतदार अवस्थेत

चेन्नईला विजयासाठी १२ चेंडूत २४ धावांची गरज आहे.

22:53 (IST) 10 Oct 2021
चेन्नईसमोर समीकरण

चेन्नईला विजयासाठी २४ चेंडूत ४४ धावांची गरज आहे.

22:47 (IST) 10 Oct 2021
चेन्नई संकटात

१५व्या षटकात चेन्नईने अंबाती रायुडूलाही स्वस्तात गमावले. चोरटी धाव घेण्याच्या नादात रायुडू धावबाद झाला. रायुडूनंतर मोईन अली मैदानात आला आहे.

22:42 (IST) 10 Oct 2021
ऋतुराजचे अर्धशतक

याच षटकात ऋतुराजने अर्धशतक पूर्ण केले. पण चेन्नईला अजून एक फलंदाजाला गमवावे लागले. शार्दुल शून्यावर माघारी परतला. करननेच त्याला तंबूत धाडले.

22:40 (IST) 10 Oct 2021
उथप्पा माघारी

१४व्या षटकात टॉम करनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात उथप्पा झेलबाद झाला. श्रेयस अय्यरने सीमारेषेवर उथप्पाचा सुंदर झेल टिपला. उथप्पाने ७ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. उथप्पानंतर चेन्नईने शार्दुल ठाकूरला फलंदाजीसाठी बढती दिली.

22:32 (IST) 10 Oct 2021
चेन्नईचे शतक

१३व्या षटकात ऋतुराजने अश्विनला चौकार खेचत चेन्नईचे शतक फलकावर लावले. १३ षटकात चेन्नईने १ बाद १११ धावा केल्या.

22:17 (IST) 10 Oct 2021
उथप्पाचे दमदार अर्धशतक

१०व्या षटकात उथप्पाने अर्धशतक पूर्ण केले. चेन्नईसाठी त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. १० षटकात चेन्नईने १ बाद ८३ धावा केल्या.

21:56 (IST) 10 Oct 2021
चेन्नईचे अर्धशतक

पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात चेन्नईने आपले अर्धशतक पूर्ण केले. अनुभवी फलंदाज उथप्पाने ऋतुराजसह अर्धशतकी भागीदारीही केली. आवेश खानच्या या षटकात उथप्पाने २० धावा चोपल्या. ६ षटकात चेन्नईने १ बाद ५९ धावा केल्या.

21:33 (IST) 10 Oct 2021
पहिल्याच षटकात चेन्नईला धक्का

दिल्लीचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाने डु प्लेसिलला क्लीन बोल्ड करत चेन्नईला पहिला धक्का दिला. डू प्लेसिसला एक धाव करता आली. तो माघारी परतल्यानंतर रॉबिन उथप्पा मैदानात आला. त्याने पहिल्याच चेंडूवर अप्रतिम फटका खेळत चौकार ठोकला.

21:15 (IST) 10 Oct 2021
दिल्लीच्या २० षटकात ५ बाद १७२ धावा

दिल्लीचा कप्तान ऋषभ पंतने २०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. पंतने ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. २० षटकात दिल्लीने ५ बाद १७२ धावा केल्या.

21:07 (IST) 10 Oct 2021
दिल्लीला पाचवा धक्का

ड्वेन ब्राव्होने १९व्या षटकात आक्रमक झालेल्या शिमरोन हेटमायरला बाद केले. हेटमायरने ३७ धावांचे योगदान दिले.

20:54 (IST) 10 Oct 2021
हेटमायर-पंतची भागीदारी

हेटमायर-पंतने १७व्या षटकात अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.

20:36 (IST) 10 Oct 2021
दिल्लीचे शतक

शिमरोन हेटमायर आणि ऋषभ पंत यांनी १४व्या षटकात दिल्लीचे शतक फलकावर लावले. १४ षटकात दिल्लीने ४ बाद १०७ धावा केल्या.

20:21 (IST) 10 Oct 2021
पृथ्वी बाद

पुढच्याच षटकात रवींद्र जडेजाला मोठा फटका खेळण्याच्या नादात पृथ्वीने डु प्लेसिसच्या हाती सोपा झेल दिला. पृथ्वीने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या.

20:18 (IST) 10 Oct 2021
दिल्लीला तिसरा धक्का

फिरकीपटू मोईन अलीने १०व्या षटकात अक्षर पटलेला बाद केले. त्याच्यानंतर ऋषभ पंत मैदानात आला आहे. १० षटकात दिल्लीने ३ बाद ७९ धावा केल्या.

20:10 (IST) 10 Oct 2021
पृथ्वीचे अर्धशतक

नवव्या षटकात पृथ्वीने जडेजाला चौकार खेचत २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ९ षटकात दिल्लीने २ बाद ७४ धावा केल्या.

20:00 (IST) 10 Oct 2021
मुुंबईकर श्रेयस अय्यर माघारी

पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात धोनीने हेझलवूडला गोलंदाजी दिली. त्याने श्रेयस अय्यरला तंबूत पाठवत त्याचा विश्वास सार्थ ठरवला. अय्यरला एक धाव करता आली. अय्यरनंतर दिल्लीने अक्षर पटेलला फलंदाजीसाठी पाठवले आहे. पॉवरप्लेमध्ये दिल्लीने २ बाद ५१ धावा केल्या.

19:56 (IST) 10 Oct 2021
दिल्लीचं अर्धशतक

आक्रमक खेळणाऱ्या पृथ्वीने वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला षटकार ठोकत दिल्लीचे अर्धशतक पूर्ण केले. ५ षटकात दिल्लीने १ बाद ५० धावा केल्या.

19:48 (IST) 10 Oct 2021
दिल्लीला पहिला धक्का

चौथ्या षटकात जोश हेझलवूडने सलामीवीर शिखर धवनला यष्टीपाठी झेलबाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. धवन ७ धावांवर माघारी परतला. धवननंतर श्रेयस अय्यर मैदानात आला आहे.

19:45 (IST) 10 Oct 2021
पृथ्वी आक्रमक

दीपक चहरने टाकलेल्या तिसऱ्या षटकात पृथ्वीने चार चौकार ठोकत आक्रमक सुरुवात केली. ३ षटकात दिल्लीने बिनबाद ३२ धावा केल्या. यात एकट्या पृथ्वीच्या २९ धावा होत्या.

19:34 (IST) 10 Oct 2021
सामन्याला सुरुवात

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्लीच्या डावाची सुरुवात केली. तर दीपक चहरने चेन्नईसाठी पहिले षटक टाकले.

19:09 (IST) 10 Oct 2021
पंतचा पराक्रम

आयपीएलमध्ये प्लेऑफ सामना खेळणारा दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत युवा कप्तान ठरला आहे.

19:06 (IST) 10 Oct 2021
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज - ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेझलवूड

दिल्ली कॅपिटल्स - ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, टॉम करन, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान, एनरिक नॉर्किया.

19:02 (IST) 10 Oct 2021
चेन्नईची प्रथम गोलंदाजी

आजच्या सामन्यात चेन्नईचा कप्तान धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:24 (IST) 10 Oct 2021
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

महेंद्रसिंह धोनी ( कर्णधार आणि यष्टीरक्षक ), ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, रॉबिन उथप्पा/सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेझलवूड.

18:23 (IST) 10 Oct 2021
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिपल पटेल/मार्कस स्टॉइनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान, एनरिक नॉर्किया.

18:22 (IST) 10 Oct 2021
हेड-टू-हेड

आयपीएलमध्ये दिल्ली आणि चेन्नई संघ २५ वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात सीएसकेचे वर्चस्व राहिले आहे. चेन्नईने १५ सामने जिंकले, तर दिल्लीचा संघ १० सामने जिंकण्यात यशस्वी झाला. आयपीएल २०२० मध्ये दिल्लीने चेन्नईला दोनदा हरवले आणि नंतर आयपीएल २०२१ च्या दोन्ही सामन्यांमध्येही धूळ चारली.