IPL 2021 : मुंबई इंडियन्स आणि मुलासाठी सचिन पोहोचला यूएईला, हॉटेल गाठल्यावर म्हणतो…

मुंबई इंडियन्सनं मराठीतून सचिनचं ‘स्वागत’ केलं. सचिननंही ‘अशी’ प्रतिक्रिया देत सर्वांची मनं जिंकली आहेत.

IPL 2021 Mumbai Indians mentor sachin tendulkar arrives in uae
सचिन तेंडुलकर यूएईला पोहोचला आहे.

मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाने एक-दोन नव्हे तर पाच वेळा आयपीएलची चमकदार ट्रॉफी जिंकली आहे. मागील दोन्ही मोसमांचा विजेता देखील हाच संघ राहिला आहे. यावेळी संघाची नजर विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकवर आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. लवकरच संघाच्या या तयारीमध्ये एक अनुभवी व्यक्तीही जोडला गेला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर लवकरच यूएईमध्ये संघाच्या प्रशिक्षणात दिसणार आहे.

मुंबई इंडियन्सने स्वतः त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि सचिन यूएईमध्ये पोहोचल्याची माहिती दिली. मुंबईने आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे, असे म्हटले आहे.  संघाच्या प्रशिक्षण सत्राचा भाग बनण्यापूर्वी सचिनला सहा दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसह संघाला प्रशिक्षण देईल. आयपीएलमध्ये ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा सचिन अर्जुनच्या खेळाचे बारकावे स्पष्ट करेल.

 

हेही वाचा – ENG vs IND : मँचेस्टर टेस्टचं सत्य गांगुलीनं सांगितलं; म्हणाला, ‘‘खेळाडूंना जबाबदार…”

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनला मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२१ च्या लिलावात २० लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले आणि तो आधीच यूएईला पोहोचला आहे आणि झहीर खान, ट्रेंट बोल्ट सारख्या दिग्गज गोलंदाजांकडून गोलंदाजीच्या युक्त्या शिकत आहे. याआधी अर्जुन मुंबई इंडियन्ससोबत काही वर्षे नेट बॉलर म्हणून होता. त्याने अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही.

सचिन आयपीएलच्या मागच्या हंगामासाठी यूएईमध्ये गेला नव्हता. रायपूरमधील रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजनंतर तो करोना पॉझिटिव्ह आढळला. सचिन २००८ ते २०११ पर्यंत मुंबई इंडियन्सचा कर्णधारही होता. सचिनने २०१३ मध्ये लीगला निरोप दिला होता. त्याच वर्षी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2021 mumbai indians mentor sachin tendulkar arrives in uae adn