इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२२) आगामी हंगाम लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांच्या समावेशासह होणार आहे. बीसीसीसीआय दोन्ही संघांना आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात उत्तम संघ तयार करण्याची संधी देईल. जुन्या आठ फ्रेंचायझींनी काही खेळाडूंना कायम ठेवले, कारण त्यांना जास्तीत जास्त चार खेळाडू निवडण्याची परवानगी होती. बीसीसीआयने अद्याप मेगा लिलावाची तारीख जाहीर केली नसली, तरी आता एका नवीन अहवालानुसार आयपीएल २०२२चा लिलाव फेब्रुवारीमध्ये होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआय CVC कॅपिटल पार्टनर्सच्या स्वीकृती स्थितीवर चर्चा करत आहे, जे अहमदाबाद फ्रेंचायझी विकत घेतल्यानंतर वादात सापडले होते. CVC कॅपिटलने अहमदाबाद फ्रेंचायझीसाठी अदानी समूहाला मागे टाकण्यासाठी ५,६०० कोटी रुपयांची दुसरी सर्वोच्च बोली लावली, परंतु सट्टेबाजी कंपन्यांशी त्यांच्या कथित संबंधांमुळे ते लवकरच बोर्डाच्या देखरेखीखाली आले.

एका अहवालानुसार, आयपीएल २०२२ मेगा लिलाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल आणि बंगळुरू आणि हैदराबाद हे मेगा इव्हेंट आयोजित करण्यासाठी आघाडीवर आहेत. cricket.com वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, “हा लिलाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. बंगळुरू आणि हैदराबाद ही दोन शहरे आहेत, आयपीएल लिलावासाठी आघाडीवर आहेत.”

हेही वाचा – Flashback 2021 : ऑलिम्पिकमध्ये भारताचे सुंदर क्षण ते ‘रोहित’युगाची सुरुवात..; वाचा क्रीडाक्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी!

दरम्यान, लखनऊ आणि अहमदाबादसाठी १ डिसेंबरपासून रिटेन्शन विंडो सुरू झाली आहे. लिलावापूर्वी प्रत्येकी ३३ कोटी रुपये खर्च करून दोन्ही संघ प्रत्येकी ३ खेळाडूंना कायम ठेवू शकतात. या खेळाडूंसाठी अनुक्रमे १५ कोटी, ११ कोटी आणि ७ कोटींचे शुल्क आकारू शकतात. तसेच, तीन खेळाडूंपैकी दोन भारतीय असणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 mega auction likely to take place in february says report adn
First published on: 21-12-2021 at 11:06 IST